भोकर :(रमेश गंगासागरे ) आज गुरुवार दि, 26 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास धुतलेले कपडे वाळवत असतांना विजेचा शॉक लागून एका 52 वर्षीय महिलेचा भोकर येथे मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत भोकर तालुक्यातील पिंपळढव येथे दोन तरुणांमध्ये वादावादी होऊन झालेल्या मारामारीत एका 29 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
       दोन्ही घटनेबाबत थोडक्यात मिळालेली माहिती अशी की, पहिल्या घटनेतील महिला, नामे रेणुका दिगंबर घोडके वय 52 वर्षे, ही आज दुपारी बारा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास धुतलेले कपडे वाळवत असतांना तीस विजेचा जोरदार धक्का बसला, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असून त्या ग्रामीण रुग्णालयात कार्यरत कर्मचारी दिगंम्बर घोडके यांची पत्नी होय, त्यांना 4 मुले आहेत, त्यातील एकाचे लग्न झाले आहे, तर तीन अविवाहित आहेत, मागील 15 वर्षांपासून  दिगंम्बर घोडके हे येथील ग्रामीण रुग्णालयात सेवक पदावर काम करतात. त्यांचे मूळ गाव कंधार तालुक्यातील बाचोटी आहे.
       तर दुसऱ्या घटनेत मौजे पिंपलढव येथिल एक 29 वर्षीय तरुण उदभवलेल्या किरकोळ कारणावरून दुसऱ्या मित्राने केलेल्या मारहाणीत मरण पावला, या बाबद रात्री उशिरापर्यंत भोकर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.