माजलगाव :(वृत्त संस्था/रमेश गंगासागरे ) भोकर नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थाप घोटाळ्यातील जामिनावर असलेले आरोपी माजी मुख्याधिकारी हरिकल्याण येलगटे यांच्यावर माजलगाव जिल्हा बीड येथील नगर परिषदेमध्ये अपहार केल्याप्रकरणी यांच्यासह सहा जनावर गुन्हे दाखल करण्यात आल्याने राज्यात मोठी खळबळ माजली आहे.
हरी कल्याण येलगटे

       घटनेतील माहिती अशी की, माजलगाव येथील नगर परिषदेतील अपहाराचे सूत्र थांबता थांबत नसून मागील 10 दिवसात दोन गुन्हे दाखल झाले आहेत, आता तब्बल तीन मुख्यअधिकाऱ्यांसह सात जणांवर 4 कोटी 13 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाने शहरात व राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तत्कालीन मुख्याधिकारी बी.सी.गावित, मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड व सध्याचे मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांच्यासह 4 लेखापाल यांनी  शहरविकास कामासाठी आलेल्या रकमेचा अपहार प्रकरणी शहर ठाण्यात मंगळवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. माजलगाव नगर परिषदेला शासनाने विविध योजनेतून कोट्यवधी रूपयांचा निधी दिला होता. परंतू तत्कालीन मुख्याधिकारी बी.सी.गावित, लक्ष्मण राठोड व सध्याचे मुख्याधिकारी हरिकल्याण जनार्धन येलगट्टे यांच्यासह तत्कालीन लेखापाल अशोक भिमराव कुलकर्णी (वांगीकर), अंगद लिंबाजी हजारे, सूर्यकांत ज्ञानोबा सूर्यवंशी, कैलास रांजवण या सात जणांनी पदाचा व अधिकारांचा दुरूउपयोग करून शासकिय अभिलेखामध्ये बनावट नोंदणी घेतल्या. 3 लाखापेक्षा अधिक रक्कमेच्या कामाची ई-निविदा कार्यप्रणाली राबवणे बंधनकारक असताना तसे न करता आर्थिक फायद्यासाठी 【 】                      
               【 】【 】
       शासकिय रक्कम 4 कोटी 13 लाख 97 हजार 942 रूपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी तेथील विद्यमान नगरसेवकांनीच  हे प्रकरण उकरून काढले होते, माजलगाव शहर ठाण्यात मंगळवारी नगर परिषदेचे स्थापत्य अभियंता कृष्णा श्रीराम जोगदंड याच्या फिर्यादीवरून तीन मुख्याधिकार्यासह चार लेखपालांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान हे करत आहेत.