भोकर (रमेश गंगासागरे ) भोकर तालुक्यातील  रायखोड  या गावात  काही नागरिक  अवैधरित्या दारूची विक्री करत असल्याने  अशी दारू  तात्काळ बंद करून सहकार्य करण्याची विनंती तेथील महिलांनी  केली आहे.
(निवेदन देताना रायखोड येथील महिला)
       मागील अनेक दिवसापासून रायखोड येथील गावात अवैधरित्या दारू विक्री होत आहे, तसेच अवैद्य दारू विक्रेते हे दारू पिणाऱ्या व्यक्तीला उसनवारी वरही दारू देत असल्याने घरात मोठा कलह वाढत आहे, गावामध्ये परवाच ही दारू पिल्यावर एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे, तसेच गावातील तरुण पिढी सुध्दा बिघडत चालली असल्याने, गावातील दारू बंद करावी अशी विनंती करत रायखोड येथील असंख्य महिलांनी काल दिनांक 21 डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक भोकर यांना निवेदन दिले आहे. या निवेदनासोबतच ग्रामपंचायत कार्यालयाने दारूबंदीसाठी 17 डिसेंबर रोजी घेतलेल्या ठरावाची एक प्रत सुद्धा त्यांनी निवेदनासोबत जोडली आहे, ग्रामपंचायत कार्यालयाने घेतलेल्या ठरावा मध्ये अवैद्य दारू विक्री करणाऱ्या दोन व्यक्तींची नावे लिहिलेली आहेत, त्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यासाठी ह्या महिलांनी पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील यांच्या दालनात येऊन गावात घडत असलेली आपबिती कथन केली, यावेळी गावातील तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री किशनराव बुद्धेवाड, राजू मंचलवाड, गिरजाबाई मंचलवाड, धूरपतबाई शिनगरवाड, चंद्राबाई मंचलवाड, महानंदाबाई शिनगरवाड, गोदावरीबाई गायकवाड, शीला घोडेकर, अनुसया गोरठकर, गोकाणीबाई अडेरवाड,योगेश अक्कलवाड, नागोराव गटकेपोड, लक्ष्मण बूद्देवाद, शिवाजी गोपतवाड, शाम सावंत, साईनाथ गटकेपोड, ज्ञानेश्वर गोरठकर, मारोती जंगेवाड, पेंटाजी पूणेबोईवाड यांच्यासह असंख्य महिला व नागरिक उपस्थित होते निवेदनाची एक प्रत दारुबंदी अधिकाऱ्याला देण्यात आल्याचे तंटामुक्तीचे अध्यक्ष यांनी सांगितले आहे, यावर वरिष्ठ काय निर्णय घेतात याकडे रायखोडचे लक्ष लागले आहे.
       
■ अवैद्य दारू विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही - विकास पाटील ■

      【 रायखोड गावात अवैद्य दारू विक्री करणारा व्यक्ती कोणीही असो त्यास पकडून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याची ग्वाही यावेळी महिलांच्या शिष्टमंडळाला भोकर चे कर्तव्यदक्ष ज्येष्ठ पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील यांनी दिली आहे.】