भोकर :(रमेश गंगासागरे ) भोकर शहरात अनेक युवक दारुच्या आहारी जात असून ते दारू पिण्यासाठी रात्रीच्या वेळेस शहरातील मोक्याची व सार्वजनिक ठिकाणे शोधून आडोशाचा आधार घेत आहेत, तसेच रिकाम्या झालेल्या बाटल्या, त्याच ठिकानावर सोडून देऊन रात्रभर झिंगत असल्याने ही ठिकाणे घाणीच्या विळख्यात सापडली आहेत.
     
संग्रहित छायाचित्र
      शहरात अनेक बार उपलब्ध असतांनाही त्याचा उपयोग न घेता काही टवाळखोर तळीराम शहराच्या विविध भागात जाऊन घाण केल्याचे  दिसून येते, मागील दोन दिवसापासून शहरातील विविध ठिकाणी फेरफटका मारला असता असे दिसून आले की, उमरी रोडवर असलेले हेलिपॅड व तेथील मैदानावर, मध्यवस्तीत असलेल्या नूतन शाळेच्या मैदानात, किनवटरोड वरील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात, पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या आवारात, तसेच शहरातील जुन्या नगरपरिषदेच्या इमारतीत अनेक रिकाम्या झालेल्या बाटल्या, कॅरीबागा, बाटल्यांचे तुकडे, रिकामी झालेली पाण्याची पाकिटे व रिकामी झालेली चिवड्याची पाकिटे सर्वत्र विखुरलेले दिसून आले आहेत, याचाच अर्थ असा होत आहे की, ज्या तळीरामांना जास्तवेळ बसून झिंगायचे आहे, असेच तळीराम बार ऐवजी या सार्वजनिक मैदानाचा वापर करत असावेत.
संग्रहित छायाचित्र
       आता काही दिवसांनी लवकरच 31 डिसेंबर येणार आहे, त्यामुळे अश्या तळीरामांना रोखण्यासाठी प्रशाषणाकडून कडक पावले उचलून त्यांना या सार्वजनिक जागेवर येऊन पिण्यापासून रोखण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.