भोकर :(रमेश गंगासागरे ) सध्या नांदेड जिल्ह्यात गाजत असलेला भोकर नगरपरिषदेचा घनकचरा व्यवस्थापन घोटाळा या घोटाळ्यातील मुख्य आरोपी व सध्या नांदेडच्या जेल मध्ये न्यायालयीन कोठडीत असलेले भोकर नगरपरिषदेचे माजी मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर ह्यांच्या जामीन अर्जावर आज दि, 16 डिसेंबर रोजी भोकरच्या जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली, यात दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेऊन मा.जिल्हा न्यायाधीश,श्री मुजीब शेख यांनी जामीन अर्जावर निकाल देण्यासाठी पुढील तारीख 18 डिसेंबर दिली आहे.
मागील सतरा महिन्यापासून फरार असलेल्या या मुख्याधिकाऱ्यास, चालू महिन्यातील 9 डिसेंबर रोजी देगलूर येथून अटक करून 10 डिसेंबर रोजी भोकर कोर्टात हजर केले असता न्यायाधीश, तळेकर यांनी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती, तेव्हापासून आशुतोष चिंचाळकर हे नांदेड येथे न्यायालयीन कोठडीत आहेत. या घोटाळ्या बरोबरच आशुतोष चिंचाळकर हे याच नगरपरिषदेतील बोगस नोकर भरती घेटाळ्यातील सुधा आरोपी असल्याने त्यांना जामीन मिळू नये म्हणून नगरसेविका अरुणाताई देशमुख यांनी ॲडव्होकेट सलीम यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता, तर दुसरा अर्ज घनकचरा व्यवस्थापनचे फिर्यादी व विद्यमान नगरसेवक श्री,केशव मुद्देवाड त्यांनी सुद्धा वकिलामार्फत आज अर्ज दाखल करून जामीन न देण्यासाठी विनंती अर्ज केला होता.

1 Comments
Good news
ReplyDelete