भोकर :(रमेश गंगासागरे ) पोलिसांना राहण्यासाठी या पोलीस स्थानकाच्या आवारात जुन्या निवासांच्या बाजूलाच नवीन घरांचे निर्माण होत आहे, या बांधकामात वापरन्यात येणारे साहित्य हे अत्यंत हलक्या प्रतीचे असल्याने भविष्यात पोलिसांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मातीमिश्रित दगडाचा भुसा (चुरा)
पोलीस स्थानकात पाठीमागील बाजूस पोलिसांच्या कुटुंबियांना राहण्यासाठी आजही जुनी निजामकालिन पोलीस वसाहत असून इथे अनेक कुटुंब रहात आहेत, ही ईमारत आता मोडकळीस आली आहे, खिडक्यांही मोडकळीस आल्या आहेत, मागील अनेक वर्षांपासून ही ईमारत गळत आहे, त्यामुळे घरात खिडक्या आणि छतातून पावसाचे पाणी येत असते, काही पोलिसांनी छताचे पाणी गळू नये म्हणून स्वखर्चाने प्लास्टिक टाकून राहण्याचा तात्पुरता उपाय शोधला आहे, काही वर्षांपूर्वी ह्या इमारतीच्या छतावर लाखोंरूपये खर्चून डाम्बरी आवरण टाकन्यात आले होते, पण ह्या डाम्बरी आवरणाचा फारसा उपयोग झाला नाही, अश्याच परिस्थितीत येथिल पोलीस दिवस काढीत आहेत.
आता शाषणाने कोट्यावधी रुपये खर्च करून जुन्या इमारतीच्या बाजूलाच नवीन तीन मजली 48 घरांची ईमारत उभी करण्यास मंजुरी दिली आहे, ह्या इमारतीचे बांधकाम एका व्यावसायिकाने हाती घेतले आहे, त्यापरीने खोदकाम करून कामाची सुरुवात ही झाली आहे, पण बांधकामात वाळूचा वापर करण्याऐवजी दगडाचा भुसा मिश्रित चुरा वापरल्या जात असल्याने ह्या बांधकामाच्या मजबुती विषयी भोकर शहरात तर्क वितर्क लढविले जात आहेत, उभे राहणाऱ्या खांबावर पिरेसे पाणीही टाकल्या जात नाही, सिमेंटचे प्रमाणही कमी आहे, तर जंग चढलेली गजाळी वापरल्या जात आहे, त्यामुळे भविष्यात ह्या ठिकाणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नागरिकांतून वर्तविली जात आहे, नागरिकांचे अहोरात्र संरक्षण करणाऱ्या पोलीसांना महाराष्ट्र शाषणाने चांगल्याप्रकारे कर्तव्य बजावता यावे म्हणून पक्की शाशकीय निवासस्थाने देणाचा निर्णय घेतला आहे, पण भोकर शहरात ही निवासस्थाने अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याने याकडे वरिष्ठ पातळीवरून लक्ष पुरविणाची मागणी शहरातील नागरिक करीत आहेत.


0 Comments