भोकर : (रमेश गंगासागरे ) हैद्राबाद येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ,प्रियंका रेड्डी ह्यांच्यावर झालेल्या अमानुष अत्याचार व हत्येचा भोकर येथील पशु वैद्यानी जाहीर निषेध नोंदवला असून तसे पत्र त्यांनी भोकर तहसीलदारांना दिले आहे.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटनेनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हैद्राबाद येथिल घटनेने संपूर्ण पशुवैद्यकीय क्षेत्रातील महिला डॉक्टरा मध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना शाषणाने आता आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे म्हटले आहे. पुढे असेही म्हटले आहे की, महिलांना सगळीकडे असुरक्षितता वाटू लागली आहे, त्यामुळे आरोपींची केस फास्टट्रॅक कोर्टात लवकरात लवकर निकाली लावून कठोरात कठोर शासन करावे, अशी मागणी ही करण्यात आली आहे, निवेदनावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ, अविनाष बुंनावार यांची स्वाक्षरी असून, यावेळी प्रणिता कांबळे, डाकोरे, बोईनवाड, साईनाथ धडेकर, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

0 Comments