भोकर :(रमेश गंगासागरे ) परतीच्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून सोयाबीन, ज्वारी आणि कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, म्हणून पंचायत समितीच्या सभागृहात आज दि, 2 नोव्हेंबर रोजी ठराव क्रमांक 102 घेण्यात आला असून यात तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना सरसगट मोबदला देण्यात यावा असे पंचायत समितीचे उपसभापती श्री, सूर्यकांत बिल्लेवाड यांनी सुचविले आहे.
भोकर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मागील काही दिवसापासून पडणाऱ्या बेमोसमी पावसामुळे खूप नुकसान झाले आहे, हातात आलेले पीक वाया गेले असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे, दीपावली कशीबशी उसनवारी करून साजरी केल्यावर, आताच्या पावसाने उरलीसुरली ज्वारी सुधा हातची गेली असल्याने सर्व गावच्या शेतकऱ्यांना सरसगट मोबदला द्यावा असा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला आहे. घेतलेल्या ठरावाची एक प्रत तहसीलदार यांना देण्यात आली आहे.
![]() |
| उपसभापती, बिल्लेवाड |

0 Comments