भोकर :(रमेश गंगासागरे ) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील बेशिस्त वाहतुकीने कळस गाठला असून चौकातून वृद्ध, महिला, पुरुष व शाळकरी विद्यार्थ्यांना चालणे कठीण झाले आहे, ही प्रवाशी वाहने, रस्त्याच्या मधोमध थांबवून प्रवाशी घेत व सोडत असल्याने नागरिकांचा एखादा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने काही जागरूक नागरिकांनी पोलिस निरीक्षक भोकर यांना निवेदन देऊन ही बाब लक्षात आणून दिली आहे.
भोकर ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री, विकास पाटील यांना काही ऑटो चालकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही नियमांचे पालन करणारे व प्रशासनास सहकार्य करणारे चालक असून, भोकर शहरातील काही कागदपत्रे नसलेले ऑटो चालक चौकात बेशिस्तपणे वागून नागरिकांना व ईतर वाहनांना अडथळा निर्माण करत आहेत, जर यांच्याकडून अपघात झाल्यास जबाबदार कोणास धरावे, म्हणून आपण कागदपत्रे तपासून नागरिकांना सहकार्य करावे, तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील विविध भागात जसे किनवट रोड, बसस्थानक रोड, नांदेड रोडवर रस्त्याच्या कडेला ऑटो थांबण्यासाठी पर्मनंट थांबा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली असून निवेदनाची एक प्रत मुख्याधिकारी नगरपरिषद भोकर यांनाही देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे, सदरील निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते संदिपभाऊ गौड, शेख जफर, बंटीभाऊ पवार, महमद जावेद, महमद खिजर, अब्दुल मुजीब अब्दुल खदिर यांच्या सह्या आहेत.

0 Comments