भोकर : (रमेश गंगासागरे ) संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक मोटारसायकल आणि ट्रकचा भोकर ते मुदखेड जाणाऱ्या रस्त्यावरील पांडुरना घाटात झालेल्या भीषण अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला आहे.
आज दिनांक 25 नोव्हेंबर सोमवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास भोकर कडून जांभळी कडे जाणारी मोटरसायकल क्रमांक एम एच 26 बीएच 10 42 आणि भोकर कडूनच मुदखेड कडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच 43 एफ 9814 यांच्यात भीषण अपघात झाला असून अपघातातील जखमी युवक भोकर तालुक्यातील जांभळी या गावचा असून त्याचे नाव आडे असल्याचे कळते, त्यास काही जागरुक नागरिकांनी आपल्या खाजगी वाहनाने नांदेड कडे उपचारासाठी घेऊन गेल्याचे समजते



0 Comments