मुंबई :-(रमेश गंगासागरे ) एका रात्रीतच महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण मिळाले असून शरद पवार आणि अमित शहा यांनी महाराष्ट्रात भाजपा आणि राष्ट्रवादीचे नवे सरकार स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने राजभवनात देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वळण दिले आहे.
       मागील एका महिन्यापासून शिवसेना आणि भाजपमध्ये सत्ता स्थापनेबाबत मतभेद चालू असल्याने शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी आपली दावेदारी निश्चित केली होती, त्यासाठी त्यांनी भाजपाचा हात सोडून राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय काँग्रेस सोबत युती करून नवे सरकार देण्याच्या विचारात असतानाच, आज सकाळी तमाम महाराष्ट्र वासियांना नवीन बातमी समजल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे लाखो शेतकऱ्यांचे पिके पाण्याखाली जाऊन अतोनात नुकसान झाले होते, अशा शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणे गरजेचे असताना राज्यात कोणाचेच सरकार नसल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणे कठीण होऊन बसले होते, त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाले होते, मुंबईमध्ये राजकीय तिढा सुटत नसल्याने नवीन निधी, नवीन कामे, त्यांना मंजुरी मिळत नव्हती, अशातच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने अनेक प्रकारची कामे ठप्प होती, तर नवीन सरकार स्थापनेसाठी प्रचंड वेळ लागत असल्याने महाराष्ट्रातील जनता अत्यंत नाराज असल्याचे चित्र राज्यात सर्वत्र दिसून येत होते, आता भाजपा व राष्ट्रवादी चे नवीन सरकार स्थापन होणार असल्याने मागील एका महिन्यापासून चालत असलेल्या विविध प्रकारच्या चर्चेवर आता पडदा पडला आहे, तर नवीन सरकार येणार असल्याने आता नागरिकांची  विविध प्रकारची कामे मार्गी लागणार असल्याच्या चर्चेने नागरिकात आनंद व्यक्त होत आहे.