भोकर : (रमेश गंगासागरे ) परतीच्या पावसाने सगळीकडे हाहाकार माजवला असून रस्ते व पिकांची पुरती वाट लागली आहे, अश्यातच मागील चार दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे  रस्त्यावर वाहन चालवणे अत्यंत जिकरीचे झाले आहे त्यामुळे वाहने जगोजागी फसून जात आहेत, अश्याच एका फसलेल्या बसमुळे शोषल मीडियावर भोकर शहरात मोठी चर्चा रंगतांना दिसून येत आहे.
हेच ते सोशल मीडियावरील चित्र

       पावसाने शेतात पिके नासुन तर रोडवर वाहने फसून जात आहेत, शेतात आणि रस्त्यावर चिखलाचा नुसता खचच खच दिसत आहे, कधी नव्हे एवढा परतीचा पाऊस पडत आहे, त्यामुळे सर्वांचीच झोप उडाली आहे, अश्यातच भोकर ते नांदेड आणि भोकर ते म्हैसा या राज्य रस्त्यावर मागील दोन वर्षांपासून संथ गतीने कामे चालू असल्याने त्याचा फटका वाहन चालकांना बसत आहे, या रोडवर आतापर्यंत अनेक जणांचे जीवही गेले आहेत, रोडवर टाकलेल्या मातीयुक्त मुरुमाचा आता पूर्ण चिखल झाला असल्याने अनेक वाहने हळुवारपणे व काळजीपूर्वक चालवत असतांना रस्त्यात फसून बसत आहेत, दुसरा पर्यायी मार्ग नसल्याने नागरिकांना मुकाट्याने त्रास सहन करावा लागत आहे, या रस्त्यावर उन्हाळ्यात धुळच धूळ उडत आहे तर , थोड्याश्या पावसानेही इथे चिखल तयार होत आहे. त्यावर मोटारसायकली मोठ्या प्रमाणावर स्लिप होत आहेत.
        आज दि,2 नोव्हेंबर रोजी एका जागरूक नागरिकाने भोकर ते म्हैसा रोडवर फसलेल्या एका बसचे छायाचित्र काढून फेसबुकवर अपलोड केले आहे, यावर अनेक नागरिक आपल्या प्रतिक्रिया मांडताना दिसून येत आहेत, रोडचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने काहींनी तर चक्क आमदार आणि खासदारावर ताशेरे ओढले आहेत,  काहींचे म्हणणे आहे की, हे काम केंद्राचे आहे, तर काहींनी हे काम राज्याचे असल्याचे म्हटले आहे, काही का असेना यात सर्व सामान्य नागरिक मात्र भरडला जात आहे हे खरे आहे, हे काम आता तरी पूर्ण होईल का असेही काहिजनांचे म्हणणे आहे. हया कामाकडे नवनिर्वाचित आमदार आणि खासदारांनी लक्ष पुरवून रस्ता पूर्ण करावा अशी मागणी केली जात आहे.