भोकर :(रमेश गंगासागरे ) भोकर नगर परिषदेचा कार्यकाळ काही महिन्यानंतर संपत असल्याने नवीन नगरपरिषदेच्या हालचालीकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
आता नवीन नियमानुसार सर्व भोकर शहरांमधून एकाच नगराध्यक्षाची निवड होणार आहे, त्यामुळे सर्व राजकीय पक्ष आतापासूनच कामाला लागले असल्याचे चित्र शहरात दिसत आहे, भोकर नगरपरिषदेची निवडणूक नवीन वर्षातील मार्च किंवा एप्रिल महिन्यात होईल असा अंदाज वर्तविला जात आहे, कालावधी अत्यंत कमी असल्याने वार्ड रचना होऊन प्रभाग निर्मिती होणार असल्याचीही चर्चा चौकाचौकात होत आहे, त्यामुळे प्रत्येक प्रभागांमध्ये तीन किंवा चार उमेदवार असतील अशी शक्यता ही राजकीय वर्तुळात होत आहे, भोकर शहराची लोकसंख्या ही 40 हजाराच्या आसपास असल्याने ह्या ठिकाणी सहा किंवा सात प्रभाग असतील अशी शक्यता वर्तविली जात आहे, त्यामुळे आत्तापासूनच अनेक जण भावी नगराध्यक्ष होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत तर भावी नगरसेवक होणाऱ्यांची संख्या शेकडोंच्या घरात जाईल अशी शक्यता वर्तविली जात आहे, ह्या नगरपरिषदेच्या निवडणुकीतही मोठा घोडेबाजार होणार असल्याच्या चर्चेने अनेक जण आत्तापासूनच दात घासून बसल्याचे चित्र दिसत आहे. सध्या भोकर नगरपरिषदेत अल्प संख्याबळावर काँग्रेसची सत्ता आहे.

0 Comments