भोकर : (रमेश गंगासागरे ) संथगतीने चालणाऱ्या कामामुळे वाहन धारकांना कमालीचा त्रास होत असून दोन वर्षांपूर्वी सुरू झालेला रस्ता आद्यप पूर्ण न झाल्यामुळे, उडणाऱ्या प्रचंड धुळीमुळे दररोज अपघात घडत आहेत, घडणाऱ्या अपघातात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर कित्येक जणांना फुफुसाच्या आजाराने ग्रासले आहे.

       भोकर फाटा ते भोकर व भोकर ते रहाटी हा राज्य रस्ता रुंदीकरण  करन्यासाठी मागील अनेक दिवसांपासून गुत्तेदाराने खोदून ठेवला आहे, पन काम काही पूर्ण केले नाही, पावसाळ्यात तर या रस्त्यावर थोड्याशा पावसानेही मोठा चिखल झाल्यामुळे वाहने जागोजाग फसून बसत होती, त्यामुळे नागरिकांना वेळेवर पोहचणे कठीण जात होते, तर बिमार रुगणांचा वीच्यार करूनच अंगावर काटा उभा रहातो,
मागील एका आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्याने उन्हामुळे रस्त्यावरचा ओलसरपणा कमी होऊन मातीचा नुसताच धुराडा उडतांना दिसत आहे, त्यामुळे या रस्त्यावरून एखादे छोटे वाहन जरी गेले तरी धुळीचे लोट उडत आहेत, यामुळे मागील वाहनास रस्ता व वाहन दिसत नसल्याने सुरक्षित अंतर ठेवून चालणे आवश्यक झाले आहे, पण या उडणाऱ्या धुळीमुळे समोरून येणारे कोणतेच वाहन लवकर दिसत नसल्याने अपघात होण्याचा धोका निर्माण होत आहे, याचे समबंधीत गुत्तेदारास काहीच देने घेणे नसल्याचे आजवर दिसून येत आहे. या धुळीचे कण फुफुसात जाऊन अनेक चालकांना फुफुसाच्या आजाराने ग्रासल्याचे नागरिक बोलत आहेत, याबरोबरच उडणाऱ्या धुळीमुळे आजूबाजूच्या शेतीतील उभ्या पिकावरही मोठे दुष्परिणाम होत असून पिकाच्या उत्पादनात घट झाल्याचे अनेक शेतकरी वर्गात बोलल्या जात आहे,
काही दिवसांपूर्वीच परतीच्या पावसाने हजेरी लावली असतांनाच भोकर ते रहाटी रस्त्यावर झालेल्या चिखलात अनेक वाहने फसली होती, त्यामुळे या रस्त्याची चर्चा शोषल मीडियावर चांगलीच रंगली होती, त्याचा परिणाम म्हणून काही वर्तमान पत्रात बातम्या सुधा प्रकाशित झाल्या होत्या, एवढे होऊनही संबंधित गुत्तेदाराने काहीच उपाय योजना केल्या नाहीत, म्हणून आज मोठ्या प्रमाणावर वाहन धारकांना त्रास सहन करावा लागतो आहे, तर काहींना जीव गमवावा लागत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.