भोकर :(रमेश गंगासागरे ) नागरिकांना परतीच्या पावसाने दिलासा मिळाला असून सुधा नदीवरील प्रकल्पात 100 % पाणी आले आहे, या पाण्याचे जतन करणे आता प्रशाशनाचे काम आहे, कारण या नदीतील पाण्यावरच भोकर वाशीयांची मदार अवलंबून आहे. मागील महिन्यात एका जागरूक नागरिकाने पाण्याची गळती होत असल्याचे तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून दिले होते.
कधी नव्हे ती सुधा नदी यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत कोरडी ठाक पडल्याने नागरिकांची झोप उडाली होती, आता भोकर वाशीयांना दोन दिवसाला एकदा पाणी मिळत आहे, त्यामुळे जोतो नागरिक पाण्याचा काटकसरीने वापर करतांना दिसून येत आहे, यावर्षी पाणी पिण्यास मिळते की नाही, अश्या विचारात नागरिक असतांनाच परतीच्या पावसाने दिलासा दिला, आता पर्यंत 900 मी.मी.पावसाची नोंद झाली असून गेल्यावर्षीच्या मनाने ही नोंद थोडी कमी आहे, या पावसामुळेच नदीत 100 % पाणी जमा झाले आहे,
अशातच अचानक मागील दोन ते तीन दिवसापासून परतीचा पाऊस चांगलाच झोडपून काढत आहे, त्यामुळे शेतकऱ्याचे सोयाबीन व ज्वारीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.हा पाऊस 9 नोव्हेंबर पर्यंत पडणार असल्याच्या बातम्या शोषल मीडियावर झळकत आहेत, त्यामुळे शेतकरी वर्गात मोठी घबराट पसरली आहे .तर शासनाने नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.

0 Comments