भोकर : (रमेश गंगासागरे ) नुकत्याच झालेल्या भोकर विधानसभेच्या निवडणुकीत प्रचंड बहुमताने अशोक चव्हाण यांचा विजय झाला होता.
दिनांक 28 ऑक्टोंबर रोजी माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण यांचा वाढदिवस असल्याकारणाने तसेच त्यांनी विधानसभेतील आपले प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचा 97 हजाराच्या वर फरकाने दारुण पराभव केल्याने ते भोकर मतदार संघात लोकप्रिय आमदार झाले आहेत. वाढदिवसाचे व दीपावलीचे औचित्य साधून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी तसेच अनेक ग्रामपंचायती मधील सरपंच व सन्माननीय सदस्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
नांदेड येथील त्यांच्या राहत्या घरी अनेक मान्यवरांनी भेटी देऊन 28 ऑक्टोबर रोजी त्यांचे अभिष्टचिंतन केले आहे, तर दिनांक 29 ऑक्टोबर रोजी भोकर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात त्यांचा विशेष वाढदिवस साजरा करण्यात आला, तेव्हाही अनेक चाहत्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
अशोक चव्हाण हे प्रथम भोकर येथे येताच त्यांनी भाजपाचे श्री नागनाथरावजी घिसेवाड यांच्या किनवट रोड वरील शाळेला अचानक भेट देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला, या ठिकाणी घिसेवाड यांनी अशोक चव्हाण यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
त्यानंतर अशोक चव्हाण यांनी भोकर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष भेटी देऊन पिकांची पाहणी केली यावर्षी परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे त्यांनी यावेळी प्रशासनाला नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचनाही दिल्याचे कळते.





0 Comments