भोकर : (रमेश गंगासागरे ) येथील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयातील माजी विद्यार्थीनी छाया कोंगेवाड यांनी उच्य शिक्षण क्षेत्रात अतिशय कठिन असलेल्या सेट परीक्षेत यश संपादन करून महाविद्यालयाचे तसेच तालुक्याची यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
     भोकर तालुक्यातिल धानोरा या गावची रहिवाशी असलेल्या मुलीने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत (अनुसूचित जमाती ) छाया पुरभाजी कोंगेवाड  यांनी २३ जुन २०१९ मधे पुणे विद्यापीठा मार्फत घेण्यात आलेल्या राज्य पातळीवरील सेट परीक्षेत इंग्रजी विषयात यश प्राप्त केले आहे. तिच्या या यशाबद्दल आई वडील, मित्र, कोंगेवाड व बट्टेवाड परिवार तसेच दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाचे प्राचार्य पंजाब चव्हाण यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी व  विद्यार्थी मिळालेल्या यशाबद्दल शुभेच्छा देवून अभिनंदन केलं आहे. छाया कोंगेवाड यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व गुरुजणांना दिले आहे.