भोकर : (संदिप गंगासागरे ) फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते पत्रकार रमेश गंगासागरे आणि एसटी महामंडळातील बस चालक श्री दत्तात्रेय गंगासागरे यांचे वडील ज्येष्ठ नागरिक श्री गोविंदराव संभाजी गंगासागरे राहणार भोकर यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले होते त्यांच्या अंत्यविधीला डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय क्षेत्रातील बड्या व्यक्तींची उपस्थिती लाभली होती.
कै.गोविंदराव गंगासागरे (९६) यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू ,सोज्वळ व प्रेमळ होता, त्यांच्यावर श्री संत रविदास महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा पगडा होता ते खेड्यापाड्या मध्ये गटई कामानिमित्त जात असत तेव्हा ते फावल्या वेळात तिथे कामानिमित्त येणाऱ्या लोकां जवळ रविदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती आदर भाव व्यक्त करत होते, अशा सोज्वळ गोविंदराव गंगासागरे यांचा मृत्यू शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोंबर 2019 रोजी रात्री साडे दहा वाजताच्या दरम्यान झाला. त्यांचा अंत्यविधी शनिवार दिनांक 5 ऑक्टोंबर 2019 रोजी हिंदू स्मशानभूमी वैकुंठधाम येथे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास करण्यात आला यावेळी त्यांच्या अंत्यविधीस तसेच गंगासागरे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी राजकीय क्षेत्रातील बापूसाहेब देशमुख गोरठेकर, नामदेव आयलवाड, सुभाष पाटील गौड, गणेश पाटील कापसे बटाळकर, माधव पाटील मिर्झा ताहेर बेग, हमीदखान पठाण, वडगावकर, रमेश कोंडलवाड, सुभाष पाटील किन्हाळकर, नागोराव शेंडगे, पत्रकारिता क्षेत्रातील ज्येष्ठ पत्रकार एल.ए.हिरे, उत्तम बाबळे, गंगाधर सवई, राजेश वाघमारे, बालाजी नारलेवाड, दशरथ भदर्गे, सुभाष तेले, सिद्धार्थ जाधव, जयभीम पाटील, अमोल पोलादवार, शंकर कदम सामाजिक क्षेत्रातील अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रप्रकाश देगलूरकर, नामदेव फुलपगार, शिवराज कांबळे, तुकाराम टोम्पे, श्री बाबरे साहेब, संतोष बोराळकर, प्राध्यापक रामदास कुंडलकर, भोकर पंचायत समितीचे विस्ताराधिकारी कांबळे साहेब, ग्रामसेवक बालाजी इंगळे, ॲडव्होकेट सिद्धार्थ कदम, ॲडव्होकेट परमेश्वर पांचाळ, ॲडव्होकेट कमलेश चौदनते, डॉक्टर मारावार, डॉक्टर पुरुषोत्तम कल्याणकर, यांच्यासह हजारो आप्तेष्ठ मित्रपरिवार आणि शेजारी पाजारी सहभागी झाले होते. यावेळी अनेक मान्यवरांनी कै.गोविंदराव गंगासागरे यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या होत्या. शेवटी त्यांच्यावर साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले.

0 Comments