भोकर : (रमेश गंगासागरे ) श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली वंचित बहुजन आघाडी ही मॅनेज होणारी आघाडी नसून तसेच त्यांचे उमेदवारही कदापिही मॅनेज होणारे उमेदवार नसून विरोधक अफवा पसरवत आहेत, त्यांच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका, विरोधकांच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना ते म्हणाले की, बाळासाहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासारख्या उपेक्षिताला उमेदवारी दिली असून मला कोणी विकत घेण्याची भाषा करू नये, मी मॅनेज होणारा उमेदवार नसून मॅनेज करणारा उमेदवार असल्याचे प्रतिपादन त्यांनी जाहीर सभेत केले.
आज शुक्रवार दि,4 ऑक्टोबर रोजी दुपारी नामदेव आयलवाड यांनी लहुजी चौक उमरी टी पॉईंट पासून उमेदवारी भरण्यासाठी भव्य रॅली काढली होती, या रॅलीत हजारो महिला व पुरुषांनी हातात वंचित बहुजन आघाडीचे ध्वज व निशाणी चिन्ह घेतले होते, तर एका सजविलेल्या वाहनावर उमेदवार नामदेव आयलवाड हात उंचावून नागरिकांना अभिवादन करत होते, ही रॅली मुख्य रस्त्याने येऊन सराफा गल्लीत मिटीका शेर जवळ जाहीर सभेत रूपांतरित झाली, सभेच्या मंचावर जेष्ठ कार्यकर्ते तथा पत्रकार एल. ए.हिरे, नागोराव शेंडगे, भिमराव दुधारे, केशव मुद्देवाड, ऍड.कमलेश चौदनते, भिम शाहीर साहेबराव येरेकर, मिर्झा बेग, नितीन कसबे, सुनील कांबळे, राजेश रापते, दिनेश लोणे, बाबुराव गाडेकर, दत्ता भाऊ डोंगरे, सुभाष तेले, राजेश चंद्रकर, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती, पुढे बोलतांना आयलवाड म्हणाले की, माझ्या सभेची विरोधकांनी मोठी धस्की घेतली असून सभेला जमणारी गर्दी लक्षात घेऊन मला सभेचे मोंढा मैदानाचे ठिकाण मिळू दिले नाही, सभेला येणाऱ्या लोकांमध्ये अपप्रचार करून सभा होऊ न देण्याचे षडयंत्र रचले, पण बाळासाहेबांवर प्रेम करणारी जनता आज हजारोच्या संख्येनी इथे आलेली पाहून माझा विजय आजच निश्चित झाल्याचा आनंद मला होतो आहे, असे ते म्हनाले, मला एक संधी देऊन पहा निश्चितच तुमचे मत वाया जाऊ देणार नाही, याची ग्वाही मी देतो, यावेळी पत्रकार एल. ए.हिरे, नागोराव शेंडगे, भिमराव दुधारे, केशव मुद्देवाड, ऍड.कमलेश चौदनते, भिम शाहीर साहेबराव येरेकर, मिर्झा बेग, नितीन कसबे, यांनी जोरदार भाषणे करून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारास भरघोस मतांनी निवडून आणण्याचे आव्हानं केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दशरथ भदर्गे यांनी केले तर आभार सुनील कांबळे यांनी मानले, कार्यक्रमास भोकर, मुदखेड, आणि अर्धापुर येथून असंख्य महिला व पुरुष मतदार आले होते.
![]() |
| वंचितच्या सभेला जमलेला जनसमुदाय महिलांची उपस्थिती लक्षणीय होती |


0 Comments