नांदेड: जिल्ह्यातील नऊही विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे नांदेडला येत आहेत. त्यांची पहिली सभा सोमवारी 14 रोजी सांयकाळी बारड इथे होणार आहे. या सभेची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. 
        विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची मुदखेड तालुक्यातील बारड इथे सभा होणार आहे. सांयकाळी पाच वाजता या सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेची सध्या जय्यत तयारी सुरू आहे. खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे स्वतः बारड इथे हजर असून सभेच्या तयारीचा आढावा घेत आहेत.
       दरम्यान सोमवारी किनवट मध्ये आयोजीत केलेली मुख्यमंत्र्याची सभा पुढे ढकलली आहे. किनवट येथे लवकरच मुख्यमंत्री फडवणीस यांची सभा होणार असून त्याचे नियोजन करण सुरू आहे. बारड हे भोकर विधानसभा मतदार संघातील मध्यवर्ती ठिकाण आहे. भोकर-मुदखेड आणि अर्धापुर इथल्या मतदारांना बारड हे ठिकाण जवळच असल्याने बारडला सभा ठेवण्यात आल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले आहे.