धर्माबाद :(रमेश गंगासागरे) गेल्या सात वर्षाच्या काळात ‘बाभळी’ बंधारा यंदा पहिल्यांदाच भरत आलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ऑक्टोबर अखेर पर्यंत या बंधाऱ्याचे दरवाजे बंद करता येत नाहीत. त्यामुळे या बंधाऱ्यात कधीही पाणी साचत नसे, मात्र यंदा परतीच्या पावसाने बाभळी बंधारा भरत आलाय, त्यातून चार तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिल्यांदाच रब्बीचा हंगाम घेता येणार आहे.
नांदेड जिल्ह्यातील नायगाव, उमरी, धर्माबाद आणि बिलोली तालुक्यात आनंदोत्सव साजरा केल्या जातोय. बाभळी बंधाऱ्याची दरवाजे सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशानुसार ऑक्टोबर अखेरीस बंद करता येतात. त्यामुळे आजवर बाभळी बंधाऱ्यात कधीच साचले नाही. कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या या बंधाऱ्याच्या सांगाड्याकडे नुसते पाहत बसण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय शिल्लक न्हवता. मात्र यंदा परतीच्या पावसाने गोदावरी नदीवरचा हा बाभळी बंधारा तुडुंब भरलाय. नियमानुसार या बंधाऱ्याचे दरवाजे पावसाळ्यात बंद करता येत नाहीत. त्यासाठी ऑक्टोबर अखेरची मुदत देण्यात आलेली आहे. त्यानुसार काल या बंधाऱ्याचे दरवाजे बंद करण्यात आले. यावेळी दोन्ही राज्याचे सिंचन अधिकारी आणि शेतकऱ्यांची मोठी संख्या होती. बाभळी बंधाऱ्यातील पाण्याचा नायगांव, उमरी, धर्माबाद आणि बिलोली तालुक्याला लाभ होणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. दरम्यान मुख्यमंत्री फडवणीस यांनी विधानसभा निवडणुकीत बंधाऱ्याच्या दरवाजे लावण्या बाबत फेरविचार करणार असल्याचे आश्वासन दिले होते. प्रसंगी पुन्हा न्यायालयात जाणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यामुळे मुख्यमंत्री फडवणीस यांणी शब्द पाळावा अशी चार तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला तरच बाभळी बंधाऱ्याचा या भागाला कायमस्वरूपी फायदा होऊ शकतो, कारण यावर्षी सारखा परतीचा पाऊस हा इतिहासात फार कमी वेळा पडत असतो. त्यामुळे बाभळीचे दरवाजे बंद करण्याच्या तारखेत बदल करून घेणे आवश्यक आहे.

0 Comments