भोकर :(रमेश गंगासागरे ) आज गुरुवार दिनांक 3 आक्टोंबर रोजी खा.चिखलीकर यांच्यासोबत प्रचंड शक्तीप्रदर्शन करत गोरठेकरांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत खा.चिखलीकर बोलत होते, ते म्हणाले की, मला विरोधक जातीयवादी म्हणून बोलत आहेत, मी जातीवादी असतो तर तेव्हा आमदारच झालो नसतो, कारण माझ्या मतदार संघात 40% मतदार हे मुस्लिम आहेत, आज मी जे आहे ते त्यांच्यामुळे आहे, तर बापूसाहेब हा माणूस दिलेल्या शब्दाला जागणारा माणूस आहे, एक वचणी असून निष्कलंक आहे, म्हणून ह्यांना एक संधी द्या मी ह्या संधीचे सोने करून दाखवतो असे ते म्हणाले.
क्रांतिवीर लहुजी चौक येथून निघालेल्या भव्य रॅली मध्ये बापूसाहेब देशमुख गोरठेकर, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, प्रणिता ताई देवरे चिखलीकर, यांच्यासह हजारो नागरिकांनी रॅलीत सहभाग घेतला होता, ही रॅली मुख्य रस्त्याने येऊन नांदेड रोड वरील व्यंकटेश टॉकीजच्या भव्य मैदानावर आयोजित जाहीर सभेत विसर्जित झाली, मंचावर राम पाटील रातोळीकर, ओमप्रकाश पोकर्णा, शिवाजी पाटील किन्हाळकर, दिवाकर रेड्डी, बबनराव बारसे, बाबुराव दंडवे, प्रवीण भाऊ साले, शेख जुल्फिकार, यांच्यासह प्रत्येक तालुक्याचे भाजपाचे तालुकाध्यक्ष विराजमान झाले होते, पुढे बोलताना चिखलीकर म्हणाले की, आम्ही आमच्या आयुष्यात कधीच जातीयवाद केला नाही, सर्व धर्मांना मी सोबत घेऊन आलो त्यामुळे तुमच्या आशीर्वादामुळे मी आज येथे उभा आहे, भोकर तालुक्यात अनेक विकासाचे कार्य मार्गी लावण्याचे काम मी नुकतेच हाती घेतले असून पाळज येथील गणपती मंदिराला पर्यटन व तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला, सुधा प्रकल्पाला पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र मिळवून दिले, तसेच पिंपळढव येथील तलावास सुद्धा पाणी उपलब्धतेचे प्रमाण पत्र मी मंजूर करून आणले आहे, तसेच भोकर तालुक्यातील 71 गावांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मी जातीने लक्ष देत आहे, पोहरादेवी देवस्थान विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी काही महिन्या खाली 125 कोटी रुपयांची मदतनिधी दिला आहे, त्यामुळे बंजारा बांधवांचे श्रद्धास्थान आता लवकरच विकसित होईल, ऊर्ध्व पेन गंगा प्रकल्पाचे पाणी इतर ठिकाणी पळविण्याचे पाप चव्हाण यांनी केले, माझ्याकडे पुरावे आहेत, पण मी ते पाणी इतरत्र कुठेही जाऊ देणार नसून नांदेड जिल्हा व भोकर मतदारसंघ यांच्यात हे पाणी विभागून दिले जाईल असेही ते यावेळी म्हणाले, रेल्वेमार्गासाठी मी 5 हजार 152 कोटी रुपयांचा निधी केंद्रातून मंजूर करून आणला असून लवकरच नांदेड जिल्ह्यात रेल्वेचे जाळे पसरणार असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले आहे, विरोधक अनेक भूलथापा देत असून भोळ्याभाबड्या जनतेने ह्या भूलथापांना बळी न पडता बापूसाहेब गोरठेकर यांना सर्वात जास्त मतांनी निवडून आणून सहकार्य करावे अशी विनंती शेवटी त्यांनी केली, यावेळी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश केलेल्या नगरसेविका विजयाताई घुमनवाड यांनीही मंचावर आपले विचार व्यक्त केले, तसेच सुभाष पाटील किन्हाळकर, शेख जुल्फिकार, बबन बारसे, राम पाटील रातोळीकर, श्री कोपुलवार, ओमप्रकाश पोकर्णा यांनी आपले परखड विचार व्यक्त करून बापूसाहेबांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले, कार्यक्रमास भोकर अर्धापूर व मुदखेड येथील असंख्य मतदार बांधव सभेमध्ये सामील झाले होते.

0 Comments