 |
| छाया: संदिप गंगासागरे |
भोकर :(रमेश गंगासागरे ) परिसरातील असंख्य शेतकरी दसरा व दिवाळी सणानिमित्तने आपल्या शेतात झेंडूच्या फुलांची शेती नित्यनियमाने करत असतात त्यांना भावही बऱ्यापैकी येत असतो पण यावर्षी परतीच्या पावसाने फुले कोमेजून जात आहेत, तसेच फुलांची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने झेंडूला 10 ते 15 रुपये किलो दर मिळत आहे त्यामुळे ऑटोचे भाडेही निघत नसल्याचे पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे.
 |
| छाया : संदिप गंगासागरे |
दिपावलीस लक्ष्मी पूजनात झेंडूच्या फुलास मान असल्याने या फुलांची विक्री जास्त होत असते हे लक्षात घेऊन, रायखोड, हळदा, पोमनाळा, सोनारी, बटाळा, धानोरा, किनाळा, रेनापुर, पांडुरना, व भोसी भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर सणासुदीच्या काळात झेंडूची लागवड करून फुल शेती करत असतात, त्यांच्या फुलास दरवर्षी 40 रु. ते 60 रु.भाव मिळत असत, पण यावर्षी परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणावर झेंडूच्या शेतीचे नुकसान केले असल्याने फुले कोमेजून जात आहेत, त्यामुळे फुलास मिळणारा योग्य भाव मिळत नाही, परिणामी 10 ते 15 रुपये किलो प्रमाणे कवडीमोल भावात फुले आज शेतकरी ओरडून विकताना दिसत आहेत. याबाबद रायखोड येथिल शेतकरी विठ्ठल पुपलवाड यांच्यासह काही शेतकऱ्यांची प्रतिक्रिया घेतली असता, ते म्हणाले की, यंदा फुलांचा भाव पडल्याने आम्ही दीपावली कशी साजरी करावी, मुलांना कपडे कशे घेणार, ऑटोरिक्षा चे भाडे घरातून द्यावे लागत आहे, बियाण्यांचा, लागवडीचा, व औषधीचा खर्चही निघत नसल्याने शाषणाने आम्हाला अनुदान द्यावे, असे अनेक शेतकरी बोलत आहेत.
0 Comments