भोकर : (रमेश गंगासागरे ) 85 भोकर विधानसभेकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते ही निवडणूक अत्यंत चुरशीची व उत्कंठावर्धक होईल अशी आशा असतानाच आज निकालाने सर्वांना अनपेक्षित धक्का दिला व यात राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा एकतर्फी विजय झाल्याने भोकर मध्ये सर्वत्र जल्लोषाचे वातावरण पहावयास मिळाले.
आज दिनांक 24 ऑक्टोंबर गुरुवारी सकाळपासून तहशील कार्यालयाच्या इमारतीमध्ये कडेकोट बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाली, सुरुवातीस टपाली मतदान मोजण्यात आले, या टपाली मतदाना पासूनच अशोक चव्हाण यांनी सर्वाधिक मताधिक्य घेत शेवटच्या फेरीपर्यंत हे मताधिक्य कायम ठेवले होते, त्यामुळे त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे उमेदवार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांना कोसो दूर मागे टाकून अशोक चव्हाण हे 97 हजाराच्यावर मताधिक्क्याने निवडून आले, अशोक चव्हाण यांच्या समर्थकानीं तहसीलच्या आसपास सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती, यावेळेस आपल्या नेत्याला आमदार करणारच असा ठाम विश्वास त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता, दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अशोक चव्हाण हे महाराष्ट्रातील सर्वात जास्त मताधिक्य घेऊन 2019 मध्ये निवडून येणारे पहिले आमदार ठरले आहेत, अशोक चव्हाण हे विजयी उमेदवार घोषित होण्याच्या पूर्वीपासूनच मुदखेड, अर्धापूर येथून आलेल्या समर्थकांनी व भोकर येथील असंख्य कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत, ढोल ताशे व फटाक्यांच्या आतषबाजीत प्रत्येक फेरीअखेर जल्लोष साजरा करत होते, त्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद ओसंडून वाहतांना दिसून येत होता.


0 Comments