भोकर : (रमेश गंगासागरे ) प्रत्येक नागरिक व राजकीय पक्षाला निवडणूक आयोग जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे, राजकीय प्रचारासाठी धार्मिक स्थळाचा उपयोग करता येत नाही असे कडक् निर्देश असतानाही भोकर मतदार संघातील अर्धापूर जिल्हा नांदेड येथील सत्य गणपती दाभड मंदिराच्या पाठीमागे राजकीय प्रचार करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती त्यामुळे सभा आयोजित करणाऱ्या नागरिकावर अर्धापूर पोलीस स्टेशन मध्ये आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेबाबत थोडक्यात माहिती अशी की, 85 भोकर विधानसभा क्षेत्र अंतर्गत दाभड येथील सत्य गणपती मंदिराच्या पाठीमागे दक्षिणेस 0 6 कि मी किमी बीट क्रमांक 0 2 येथे बाबुराव कोहळीकर, बाळासाहेब कदम, व संभाजीराव लांडगे यांच्यासह दीडशे ते दोनशे लोकांनी राजकीय प्रचारासाठी विना परवानगी धार्मिक स्थळाचा वापर केल्याप्रकरणी पथक प्रमुख श्री सुहास किशनराव गायकवाड करनिरीक्षक नगरपंचायत अर्धापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांचेवर दिनांक 1 ऑक्टोंबर 2019 रोजी 1 ते 5 गु.र.न. 247 /2019 कलम 143, 188 व सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री नांदगावकर हे करत आहेत.
0 Comments