भोकर : (रमेश गंगासागरे ) मागील दहा वर्षापासून वार्ड क्रमांक 11 भीम टेकडी बस स्टँड जवळच्या भागात असंख्य नागरी सुविधा उपलब्ध न झाल्याने येथील नागरिकांनी विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकत असल्याचे निवेदन सर्व वरिष्ठांना दिले आहे.

       भीम टेकडी  भागात बहुतांशी दलित व बहुजन समाज असून वेळोवेळी प्रशासनाला सहकार्य करणारा आहे, तरीपण ह्या भागात सार्वजनिक रस्ते, नाल्या, लहान बालकांसाठी अंगणवाडी, सोलार दिवे, अशा पद्धतीच्या कोणत्याच नागरी सुविधा आजपर्यंत ह्या लोकांना न मिळाल्याने त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, माळ राणा  लगत हि वस्ती असल्याने  तसेच  माळरानाचे पाणी वाहून जाण्यासाठी माळा कडील बाजूस मोठीं नाली नसल्याने पावसाचे पाणी नागरिकांच्या थेट घरांमध्ये येत असते, या आशयाचे निवेदन नागरिकांनी 85, भोकर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी, मुख्याधिकारी नगरपरिषद भोकर व पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन भोकर यांना देण्यात आलेल्या  असून निवेदनावर भीम टेकडी येथील असंख्य नागरिकांच्या सह्या आहेत. आता या समस्यावर प्रशासन तातडीने कोणत्या उपाययोजना करते हे  योग्य ठरेल.
      निवेदनात असेही म्हटले आहे की आम्ही संविधान प्रेमी नागरिक असून मतदाना सारख्या प्रक्रियेचा आदर करतो पण गल्लीमध्ये नागरी सुविधा नसल्याने हा बहिष्कार सारखा कट्टू मार्ग स्वीकारावा लागत असल्याचेही दिलेल्या निवेदनात म्हटले आहे