भोकर : (रमेश गंगासागरे ) 85,भोकर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 21 ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रशषणाच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक गावात, व खेड्यापाड्यात मतदानाविषयी जनजागृती होऊन मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी सवाद्य कला पथकाद्वारे मनोरंजन करून जागृती करण्यात येत आहे.
पेटी, तबला, ढोलकी, आणि काही शिक्षकांचा मधुर आवाज असलेल्या या संचात 'स्वीप' पक्षप्रमुख म्हणून डॉ. डी. एस. मठपती यांनी तालुक्यातील कलाप्रेमी शिक्षकांच्या माध्यमातून हे कलापथक तयार केले, त्याद्वारे संपूर्ण भोकर तालुक्यातील सोमठाणा, धावरी खुर्द, सिंगारवाडी, थेरबन, देवठाणा, आमठाणा, पाळज, किनी, व शहरातील डॉक्टर आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजीचौक, बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन , रशीद टेकडी, बिलाल नगर, लहुजी चौक आदी भागात लोकगीताच्या माध्यमातून मतदार जागृती केली गेली, याकामी 'स्वीप' पथकातील सहशिक्षक लक्ष्मण सुरकार, नरसिंग जीदेवाड, आर. आर. सोनकांबळे, आर.एन.शिंदे, शाहीर उत्तम साबळे, ए.वाय.कासराळे, सुधांशू कांबळे, अनिल शिरसाट, जगदीश थडवे हे परिश्रम घेत असून त्यांना जागोजागी मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

0 Comments