नांदेड :- (रमेश गंगासागरे ) 86, नांदेड उत्तर विधानसभेचे बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉ.प्रकाश गोविंदराव बगाटे हे लोकशाही मार्गाने निवडणुकीचा प्रचार करत असतांना, यांचे काल दुपारी अज्ञात लोकांनी अपहरण केले आहे. या घटनेचा नांदेड येथील अनेक बहुजन चळवळीतील संघटनांनी निषेध केला आहे, भाग्यनगर पोलीस स्टेशन मध्ये  सदरील अपहरणाचा गुन्हा दाखल झाला असून हे पोलीस यंत्रणा त्यांचा कसून शोध घेत असून लवकरच  अपहरणकर्ते कोण आहेत याचा उलगडा होईल, अशी आशा वर्तविण्यात येत आहे, चर्मकार समाज समन्वय समिती व अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद शाखा जिल्हा नांदेड यांनि जाहीर निषेध व्यक्त केला आहे.