भोकर : (रमेश गंगासागरे ) 85, भोकर विधानसभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून इथे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री श्री, अशोक चव्हाण आणि माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्यात जबरदस्त मुख्य लढत होत आहे, या निवडणुकीत आता रंग चढत असून मतदानाची तारीख जवळजवळ येत आहे, तसा प्रचारानेही वेग घेतला आहे, प्रचार कामी कार्यकर्त्यांचा तुटवडा जाणवत असल्याने या नेत्यांनी गल्लीबोळात राहणाऱ्या नवनिर्वाचित फुटकळ कार्यकर्त्यांचा सहारा घेत त्यांच्या घरी जाऊन चहा पाणी घेत असल्याने त्यांना सुगीचे दिवस आल्याचा भास होत आहे.
भोकर मतदारसंघातील तीनही तालुक्यातील गावागावात व वाडी तांड्यावर हात जोडत येऊन कधी न दिसणारे चेहरे प्रचार करत असल्याने, मतदार राजा थोडासा अचंबित झाला आहे, सुजान मतदार राजाही अशा कार्यकर्त्यांना हो तुम्हालाच मतदान करणार आहे आमचाही विचार करा, असे बोलून कोड्यात ठेवत असल्याने मतदारांचा अंदाज बांधणे कठीण जात असल्याचे चित्र सगळीकडे पाहावयास मिळत आहे, मतदार संघात सगळीकडे मिळेल त्या वाहनाने नेते आणि कार्यकर्ते प्रचाराला लागले असल्याने निवडणुकीला आता खरे रंग-रूप आल्याचे दिसून येत आहे, तर काँग्रेसचे अशोक चव्हाण आणि बीजेपी चे बापूसाहेब गोरठेकर यांनी अनेक वाहनावर डिजिटल होर्डिंग व लाउडस्पीकरच्या साह्याने जागोजाग बैठका घेऊन प्रचार करत असल्याने गावागावात निवडणुकीचे वातावरण तापले असले तरीही, खरे चित्र स्पष्ट होण्यासाठी अजून काही अवधी लागणार असल्याचे राजकीय जाणकार बोलत आहेत.
या दोन तगड्या उमेदवारा सोबतच वंचित बहुजन आघाडीचे नामदेव आयलवाड हे पण दंड थोपटून उभे असल्याने वंचित बहुजन आघाडी किंग मेकर ठरणार असल्याचे भाकीत अनेक राजकीय जाणकार करत आहेत, त्यांनीसुद्धा प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला कमी लेखून चालणार नसल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे.


0 Comments