भोकर : (रमेश गंगासागरे ) विधानसभेची आचारसंहिता लागल्यापासून पहिल्यांदाच आज एका गाडीतून भोकर परिसरात मोठी रक्कम पकडली असल्याने खळबळ उडाली आहे.
संग्रहित छायाचित्र

      आज दि, 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 :45 वाजताच्या दरम्यान भोकर ते भैसा रोडवरील रहाटी चेक पोष्ट जवळ आचार संहिता पथक आपले कर्तव्य बजावत असतांना तेलंगणा पासिंगची सिल्व्हर रंगाची मारुती ओमनी गाडी क्रमांक TS-16-TF- 8503 ची चौकशी केली असता त्यातील संगम पोश्टटी चिना बालय्या रा.बालगोट मंडळ श्रीकोंडा जि. निजामाबाद तेलंगाणा यांच्याकडून पिशवीत असलेले 3 लाख 70 हजार रोकड रुपये जप्त केले. एवढी मोठी रक्कम पहिल्यांदाच पकडली गेली असल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे, या रक्कमेबाबद त्यांच्याकडून अधिकची माहिती घेण्यासाठी एस.एस. टी.चे पथक प्रमुख श्री, रामोड हे पूर्ण तपास करत आहेत. त्या नंतरच ह्या रक्कमेबाबद अधिकचा खुलासा केला जाईल अशी शक्यता आहे.


-----------------------------------------------------------------

             भोकर पोलिसांचे पथसंचलन

भोकर :- प्रतिनिधी


भोकर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान शहरातील मुख्य मार्गाने भोकर पोलिसांनी पथसंचलन केले.