भोकर / उमरी :(प्रतिनिधी )  उमरी तालुक्यातील गोळेगाव येथील एका ईसमाचा खून करून मयताच्या प्रेताचे तुकडे तुकडे करून रेल्वे पटरीवर टाकून पुरावा नष्ट करू पाहणाऱ्या तिघा जणांना भोकर येथील जिल्हा व सत्र न्यायधीश श्री, मुजीब शेख यांनी जन्मठेपेची सजा सुनावली तर साक्ष बदलणाऱ्या एका साक्षीदारास न्यायालयाने खडे बोल सुनावत त्यांच्यावर कार्यवाई करण्यासंदर्भात कायदेशीर नोटीस बजावली आहे.

       उमरी तालुक्यात चार वर्षांपूर्वी खळबळ उडवून देणाऱ्या सदरील घटनेबाबतची थोडक्यात माहिती अशी की, गोळेगाव येथिल मयत गणपत कोंडीबा यमलवाडा यांच्या राहत्या घरी दिनांक 3 जून 2015 रोजी रात्री 11 वाजताच्या दरम्यान येऊन आरोपी नामे सुभाष नामदेव यमलवाड, मारुती भीमराव यमलवाड, बालाजी मूतेलु यमलवाड, गणेश पांडुरंग यमलवाड, आणि सुरेश तुकाराम यमलवाड यांनी येऊन गणपत यमलवाड यांना काम आहे असे सांगून घरून घेऊन गेले, त्यानंतर त्यांनी त्याच रात्री गणपत यांचा खून केला व त्याचे हात पाय तोडून बोळसा शिवारातील रेल्वे पटरीवर टाकून दिले होते, त्या ठिकाणी मयताचा पॅन कार्ड, कुटुंबाचा फोटो, रेल्वेचे तिकीट, एटीएम कार्ड, आणि निवडणूक ओळखपत्र टाकून दिले होते, सदरील घटनेची फिर्याद मयताची आई धोंड्याबाई कोंडीबा यमलवाड यांनी उमरी पोलीस स्टेशनला रीतसर दिल्यावरून उमरी पोलिसांनी पाचही आरोपी विरुद्ध कलम 302, 201 नुसार गुन्हा दाखल करून कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले, उमरी तालुक्यात खळबळ माजविणाऱ्या या घटनेचा नुकताच निकाल लागला असून भोकर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री मुजीब शेख यांनी या गुन्ह्यात आरोपी क्रमांक 1 सुभाष नामदेव यमलवाड, 2 मारुती भीमराव यमलवाड आणि 3 सुरेश तुकाराम यमलवाड यांना खूनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंड तसेच कलम 201 नुसार पाच वर्ष शिक्षा ठोठावली यात एक साक्षीदार फितूर झाल्याने खोटी साक्ष दिली होती, त्याला न्यायमूर्ती श्री मुजीब शेख यांनी खडे बोल सुनावत त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात नोटीस बजावली आहे, सरकारी वकील म्हणून रमेश राजूरकर यांनी काम पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून उमरी पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री वडजे पाटील यांनी या कामी मदत केली.