भोकर :(रमेश गंगासागरे ) 85, भोकर विधानसभा मतदारसंघात आता सर्व चित्र स्पष्ट झाले असून सरळ लढतीचा विचार केला तर काँग्रेसचे अशोक चव्हाण, भाजपाचे बापूसाहेब देशमुख गोरठेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे नामदेव आयलवाड यांच्यात तिरंगी लढत अटळ असल्याचे राजकीय जाणकार नागरिकांत चर्चा रंगात आहे.

       ही निवडणूक आतापासूनच अत्यंत उत्कंठावर्धक होत असून सोशल मीडियावर गोरठेकर समर्थक आणि अशोक चव्हाण समर्थकात दररोज सवाल जवाबाच्या दररोज फैरी झडतांना दिसून येत आहेत, काल सोमवार दि, 30 सप्टेंबर रोजी काँग्रेस तर्फे अशोक चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर भाजपा व ईतर पक्षातर्फे आतापर्यंत कोणत्याच इच्छुक उमेदवारास उमेदवारी जाहीर न झाल्याने काँग्रेस समर्थक जाम खूष दिसून येत होते, मंगळवार दि,1 ऑक्टोबर रोजी दुपारी भाजपचे बापूसाहेब गोरठेकर यांना भोकर मधून उमेदवारी जाहीर झाल्याचे वृत्त भोकर मध्ये धडकताच भोकर बीजेपी व गोरठेकर समर्थकांनी मोठा जल्लोष करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात व छत्रपती शिवाजी महाराज चौकांत फटाक्यांची मोठी आतिषबाजी करून आनंद साजरा केला, तर कालच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून आईलवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती, त्यामुळे आता भोकर विधानसभेत तिरंगी लढत अटळ असल्याचे बोलले जात आहे, उमेदवारांनी आपापल्या परीने मागील एका महिन्यापासून खेड्यापाड्यात प्रचारास सुरुवात केली होती, पण आता आदर्श आचार संहिता लागू असल्याने कुठे बैठका व प्रचारसभा घ्यायची यावर निर्बंध आले असल्याने, रितसर परवानगीशिवाय काहीही करता येत नाही. प्रत्यक्ष मतदानाला अजून वीस दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. ह्या विस दिवसात भोकरची जनता काय निर्णय घेते हे पाहणेच योग्य ठरेल.