नांदेड : (रमेश गंगासागरे ) आज मी जे काही आहे ते केवळ संविधान आणि आपल्यामुळेच आहे, मला आज राष्ट्रपती  पदकाने सन्मानित करण्यात आले असून याचे श्रेय आपणास जाते, माझ्या पदाचा उपयोग तळागाळातील गरजू व गरजवंतांना मी करेल असे उदगार ज्येष्ठ पोलीस निरीक्षक राष्ट्रपती पोलीस पदक विजेते  श्री, बालाजीराव सोनटक्के यांनी नांदेड येथील चर्मकार समाजाच्या वतीने आयोजित "गौरव भूमिपुत्रांचा" ह्या कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना म्हटले आहे.   
         
        सदरील कार्यक्रम दि, 15 सप्टेंबर रोजी नांदेड येथील शिव पार्वती मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होता, कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्युत महापारेशनचे मुख्य अभियंता आर.आर.कांबळे हे होते, या कार्यक्रमात समाजाप्रती उल्लेखनीय कार्य करणारे डॉ.श्री, पी.टी.जमदाडे, (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय), डॉ. प्रमोद झुंझारे( सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट),श्री मधुकर गिरगावकर (विशेष कार्यकारी अधिकारी कृषी व फलोत्पादन मंत्रालय मुंबई), बालाजीराव दुधम्बे (प्रदेश अध्यक्ष  रविदास य धर्म संघटन),  संपादक रमेश गंगासागरे ( वॉटर कप फाउंडेशन पुरस्कार प्राप्त पत्रकार भोकर), शिवानंद जोगदंड (सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजक), व्यंकटराव सोनटक्के (माजी सैनिक) आदी मान्यवरांचा भारताचे संविधान,शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व हार देऊन  सन्मान करण्यात. आला पुढे बोलताना सोनटक्के म्हणाले की, मी ज्या समाजात जन्मलो  त्या समाजाप्रती मी काही देणे लागतो  म्हणून मी आज समाजकार्य मध्ये आहे, आपला समाज  हा  दारूच्या आहारी जात असून अंधश्रद्धा ही भरपूर प्रमाणामध्ये पाळल्या जात आहे,  म्हणून समाजाने  व्यसनाच्या नादी न लागता अंधश्रद्धा दूर ठेवून विज्ञान वादी जीवन जगावे तरच समाजाची प्रगती शक्य असल्याचे ते यावेळी म्हणाले. मी माझ्या कार्याचा सदुपयोग शेवटच्या श्वासापर्यंत तळागाळातील माणसापर्यंत करतो आणि करत राहणार असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमात उपस्थित सर्व सत्कार मूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले.
       कार्यक्रमाची सुरुवात संविधानातील प्रास्ताविकेचे वाचन करून तसेच श्री, संत गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.के.तायडे आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव दूधअंबे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार तुकाराम टोम्पे आणि ॲडव्होकेट राम जोगदंड यांनी मांनले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामचंद्र असोरे, पद्माकर बाबरे, नारायणराव सोनटक्के यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास नांदेड व नांदेड जिल्ह्यातील बहुसंख्य चर्मकार बांधव महिला व पुरुष उपस्थित होते.