भोकर : (रमेश गंगासागरे ) येथे दिनांक 5 सप्टेंबर रोजी शाहू महाराज विद्यालयाच्या भव्य प्रांगणावर खा. प्रताप पाटील चिखलीकर व मा.आ. बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाहू विद्यालय येथे अभिष्टचिंतन, नागरी सत्कार, विद्यार्थी गुणगौरव सोहळा व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शाहू महाराज विद्यालय भोकरच्या वतीने करण्यात येणाऱ्या या भव्यदिव्य कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री विश्वनाथ पाटील बनाळीकर हे राहणार असून कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माजी सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे, दत्तात्रेय रेड्डी कृषी सभापती जिल्हा परिषद नांदेड, धर्मराज देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य, भाऊसाहेब देशमुख गोरठेकर माजी सभापती पंचायत समिती भोकर, शिवाजी पाटील किन्हाळकर, माधवराव पाटील मातूळकर, बबनराव बारसे जिल्हा परिषद सदस्य नांदेड, दिवाकर रेड्डी जिल्हा परिषद सदस्य नांदेड, शिरिष भाऊ गोरठेकर सभापती पंचायत समिती उमरी, राजेश देशमुख तळेगावकर, कैलास देशमुख गोरठेकर, रमेश सरोदे, जगनरावजी शेळके नांदेड, सुरेशराव देशमुख कामनगावकर, सदाशिवराव पप्पुलवाड, अनुराधाताई खांडरे, विनायकराव कुलकर्णी, गणेशराव पाटील करखेलिकर, शिवराज जाधव, सुधाकरराव कदम देळुबकर, संतोष रावजी कपाटे, शंकरराव मुक्ततलवाड, यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून ह्या कार्यक्रमास भोकर विधानसभा क्षेत्रातील सर्व गोरठेकर प्रेमी भाजपा कार्यकर्ते व पालकांनी उपस्थित राहण्याचे आव्हान ॲड. गोविंदरावजी लामकानीकर अध्यक्ष लाल बहादूर शास्त्री शिक्षण संस्था शाहू विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी केले आहे.

0 Comments