भोकर : (रमेश गंगासागरे ) हे सरकार, शेतकरी, कामगार युवक यांची दिशाभूल करणारे असून हे सरकार उलटून टाकुन काँग्रेस चे सरकार राज्यात आणा असे उद्गार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भोकर येथील जाहीर सभेत बोलताना  केले, ते भोकर विधानसभेत काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित आहेत.

       आज 29 सप्टेंबर  रोजी  दुपारी  भोकर येथील  लहुजी चौकापासून  ते  मोंढा मैदानापर्यंत  भव्य रॅली  काढण्यात आली होती ही, रॅली वाजत गाजत  ढोल ताशाच्या गजरात भोकर येथील लहुजी चौक येथून मुख्य रस्त्याने निघून नवा मोंढा येथे जाहीर सभेच्या ठिकाणी गेली, ह्या रॅलीत  भोकर,  मुदखेड  आणि अर्धापूर  तालुक्यातील  हजारो  काँग्रेस प्रेमी नागरिक हातात  निळे  आणि  काँग्रेसचे झेंडे घेऊन सामील झाले होते, ह्या रॅलीचे रूपांतर जाहीर सभेत झाले, ह्या रॅलीला संबोधित करताना अशोक चव्हाण  पुढे म्हणाले की, हे सरकार खोटारडे असून आजपर्यंत शेतकऱ्यांना, नागरिकांना, बेरोजगारांना, फक्त आश्वासने देत राहिले आहे, मी मुख्यमंत्री असताना राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती, हे सरकार शेतकरी, बेरोजगार, व नागरिक यांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर दिशाभूल करण्याचे काम राज्य सरकार करत आहे, समस्या एक आणि उत्तर एक अशाप्रकारे दिशाभूल चालवली आहे, त्यामुळे हे सरकार उलथून टाकण्याची गरज आहे असे ते यावेळी म्हणाले, त्यांनी यासाठी चिन्मय आणि एका शिक्षकाचे यावेळी सुंदर उदाहरण दिले होते. शेवटी त्यांनी काँग्रेस पक्षाला विजयी करण्याचे आवाहन केले, कार्यक्रमास भोकर, मुदखेड आणि अर्धापूर तालुक्यातील असंख्य नागरिक उपस्थित होते.