भोकर :(रमेश गंगासागरे ) मागील 1 सप्टेंबर पासून भोकर शहरातील विविध अंगणवाड्यांमध्ये लहान बालकांसाठी राष्ट्रीय पोषण अभियाना अंतर्गत कार्यक्रम राबविले जात असून हे कार्यक्रम 30 सप्टेंबर पर्यंत चालत राहणार असल्याची माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी एम.एस. वाघमारे शहरी क्रमांक तीन  यांनी दिली आहे.

       आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी शहरातील नूतन शाळेत दुपारी मूठभर धान्य योजनेत गल्लोगल्लीत जमा केलेल्या धान्या मधून बनविण्यात आलेला सकस व रुचकर आहार वाटप करण्यासाठी बाल पंगत आयोजित करण्यात आली होती, या बाल पंगत कार्यक्रमास श्री राहुल सोनशेट्टे, डॉक्टर विजय कावळे, पत्रकार रमेश गंगासागरे, पत्रकार जय भीम पाटील,पत्रकार सिद्धार्थ जाधव, पत्रकार शिवाजी गायकवाड मुख्याध्यापक नागलवाड तसेच महिला सामाजिक कार्यकरती श्रीमती पंतोजीबाई, आणि ॲडव्होकेट तक्षशिला जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
       1 सप्टेंबर पासून चालत आलेल्या यात कार्यक्रमात वक्तृत्व स्पर्धा, हात धुवा कार्यक्रम, बेटी बचाव बेटी पढाव, महिलांसाठी बाळाच्या आहाराचे महत्व समजावून सांगणे, विविध रोगाविषयी माहिती, तसेच ॲनिमिया होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय, यासह भोकर शहरातील गल्लोगल्लीत फिरून मूठभर धान्य कार्यक्रमांतर्गत बालकांसाठी धान्य गोळा करण्यात आले होते, गोळा करण्यात आलेल्या या धान्यापासून बालकांना सकस व रुचकर आहार अंगणवाडी ताईंनी बनवून आणला होता, सदरील कार्यक्रमात प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्यानंतर उपस्थित महिलांना ग्रामीणचे श्री राहुल सोनशेट्टे  तसेच डॉक्टर विजय कावळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंगणवाडी कार्यकर्ती, शकुंतला मुनेश्वर यांनी केले तर आभार  अंगणवाडी कार्यकर्ती अरुणा ईनामदार  यांनी मानले,  कार्यक्रम यशस्वीतेसाठी तक्षशिला हिरे,  प्रणिता दुधारे,  लक्ष्मी कोरवाड,  अर्चना नरवाडे,  नफिसा  शेख नजीर, मालनबाई जाधव, गोदावरीबाई मोरे, मीनाक्षी पिलावार, द्रोपदा राजरपल्ले, शिवगंगा स्वामी, रेखा वसकलवार यांनी मोलाचे सहकार्य केले. शेवटी लहान मुलांना गरोदर माता व किशोरी मुलींची मोठी पंगत  बसवण्यात आली होती, त्यांना  एक वेळचे भरपेट जेवण देण्यात आले. या पंगतीत शेकडो बालक, गरोदर माता व  किशोरी मुली सहभागी झाल्या होत्या.