भोकर : (रमेश गंगासागरे ) नांदेड येथे पारपडलेल्या ग्रामसेवकांच्या एका बैठकीत सर्वानुमते भोकर येथील सामाजिक चळवळीत अग्रेसर असलेले व धडाडीचे ग्रामसेवक श्री, शंकर आलेवाड यांची महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन संघटना डी. एन.ई. 136 च्या जिल्हाउपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून संघटकपदी ग्रामसेवक माधुरी जाधव यांची निवड करण्यात आली, त्यामुळे त्यांचे गटविकास अधिकारी श्री, रामोड, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री,कदम, कार्यालयीन अधीक्षक श्री मुपडे, विस्तार अधिकारी श्री, कांबळे, कृषी अधिकारी  देशमुख मॅडम, दीपक पाटील, सुनील पांचाळ, बालाजी इंगळे, बी.के.पाटील, विकास भारती, किशन वडपत्रे, वसंत कोकणे, धनंजय भालेराव, सीतावार, कनोजवार, विठ्ठल लोखंडे, भागवत थलंगे, सुनीता राठोड, श्रीमती खेडकर, गायकवाड, पत्रकार रमेश गंगासागरे, यासह अनेक मान्यवरांनी निवडीचे अभिनंदन केले आहे.