नांदेड : (रमेश गंगासागरे ) विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चर्मकार समाजातील बांधवांचा नांदेड येथील चर्मकार बांधवांच्या वतीने रविवार दि,15 सप्टेंबर रोजी, शिवपार्वती मंगल कार्यालयात भावसार चौक नांदेड येथे गौरव भूमीपुत्रांचा" या कार्यक्रमांच्या अंतर्गत भव्य सत्कार करून गौरविण्यात येणार आहे.
नोकरी करत करत, समाजसेवा करणारे भोकर तालुक्यातील चिदगिरी येथिल जेष्ठ पोलिस निरीक्षक नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र श्री, बलाजीराव सोनटक्के, यांना 15 ऑगस्ट रोजी नुकतेच दिल्ली येथे राष्ट्रपती श्री, रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचाही भव्य नागरी सत्कार या वेळी करण्यात येणार असून त्यांच्या सोबत, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे डॉ. पि.टी.जमदाडे, (शाष्कीय वैद्यकीय महाविद्यालय), डॉ. प्रमोद झुंझारे (सुप्रसिद्ध रेडिअलाजिष्ठ), मा.मधुकर गिरगावकर (विशेष कार्य अधिकारी कृषी व फलोत्पादन मंत्रालय मुंबई), मा.बलाजीराव दुधम्बे (प्रदेश अध्यक्ष अ.भा.रावीदासिया धर्म संघटन), मा.श्री,रमेश गंगासागरे पत्रकार भोकर, श्री, शिवानंद जोगदंड (सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजक), मा.श्री, व्यंकटराव सोनटक्के (माजी सैनिक) आदी मान्यवरांना या ठिकाणी गौरविण्यात येनार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा.आर.आर.कांबळे,(मुख्य अभियंता विद्युत महापारेशन) हे राहणार आहेत.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वागत समितीचे एन.के.तायडे, व्यंकटराव दुधम्बे, तुकाराम टोम्पे, ऍड.राम जोगदंड, रामचंद्र आसोरे, पद्माकर बाबरे, नारायणराव सोनटक्के हे परिश्रम घेत असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाज बांधवांनी व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

0 Comments