भोकर : (रमेश गंगासागरे ) भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यापासून मा.आ. बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी भोकर विधानसभा क्षेत्रांमध्ये तुफानी प्रचाराला सुरुवात केली असून ते दर दिवशी पाच ते सहा खेड्यांना भेटी देत आहेत.

      बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांना भोकर विधानसभे मधून भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळणार असल्याच्या बातमीने जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यात कमालीचा आनंद पसरला असून ते स्वयंस्फुर्तीने साहेब आमच्या गावाला भेट द्या म्हणून गोरठेकर साहेबांना आमंत्रित करत आहेत, 2 सप्टेंबर रोजी पाळज येथील गणपतीचे दर्शन घेतल्यावर गोरठेकरांनी आपल्या झंझावाती प्रचार दौऱ्याला सुरुवात केली आहे, तेव्हापासून त्यांनी आपल्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे जाऊन बैठकावर बैठका घेत आहेत, खेडोपाडी त्यांना भरपूर प्रतिसाद मिळत असल्याचे फोटो शोषल मीडियावर झळकत आहेत, आतापर्यंत त्यांनी जवळजवळ भोकर तालुका पिंजून काढला असून भोकर तालुक्यानंतर ते मुदखेड, आणि अर्धापुरकडे आपला मोर्चा वळवनार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे, बापूसाहेब गोरठेकर हे न थकता सकाळपासूनच खेडोपाडी फिरत असल्याने भोकर तालुक्यात भाजपाचे वातावरण निर्माण झाले आहे यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य दिवाकर रेड्डी, तालुका अध्यक्ष गणपत पिठेवाड, नगरसेवक संतोष मारकवार, सुभाष पाटील घंटलवार, दत्तात्रेय पांचाळ, पप्पू गौड, डॉक्टर फेरोज इनामदार, राजेश देशमुख, शिवाजी पाटील किन्हाळकर, बाबुराव जी दंडवे,  बाबुराव पाटील आनदबोरीकर,  गणेश पाटील कापसे,  वांगलवार  सावकार,  माधव शिंदे, जवाजुद्दीन बरबडेकर, यांच्यासह अनेक जण प्रचार कामी जात आहेत.