भोकर : (रमेश गंगासागरे ) परतीच्या पावसाने सुधा नदीवरील प्रकल्पात बऱ्यापैकी पाणी आले असून या पाण्याचे जतन करणे आता प्रशाशनाचे काम आहे, कारण या नदीतील पाण्यावरच भोकर वाशीयांची मदार अवलंबून आहे.जवळपास 50% सुधा भरली असून एका जागरूक नागरिकाने पाण्याची गळती होत असल्याचे तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
कधी नव्हेती सुधा नदी यावर्षी कोरडी ठाक पडल्याने नागरिकांची झोप उडाली होती, आता भोकर वाशीयांना आठवड्यातून एकदा पाणी मिळत आहे, त्यामुळे जोतो नागरिक पाण्याचा काटकसरीने वापर करतांना दिसून येत आहे, यावर्षी पाणी पिण्यास मिळते की नाही, अश्या विचारात नागरिक असतांनाच परतीच्या पावसाने दिलासा दिला, आता पर्यंत 715 मी.मी.पावसाची नोंद झाली असून गेल्यावर्षीच्या मनाने ही नोंद खूपच कमी आहे, या पावसामुळे नदीत जवळजवळ 50% पाणी जमा झाले आहे, अशातच अचानक मागील दोन दिवसापासून प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून मोठ्या प्रमाणावर लाखो लिटर पाणी वाहून जात आहे, हे एका जागरूक नागरिकाच्या लक्षात आल्यावरून त्यांनी भोकर येथील तहसीलदार यांचे कार्यालय गाठून त्यांना लेखी निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्यात यावी अशी विनंती केली आहे, त्यामुळे प्रशाशन कामाला लागले असल्याचे आताच कळाले असून पाण्याचा विसर्ग कसा थांबवल्या जाईल याचा विचार ते करत आहेत, तात्काळ हे पाणी रोखले नाही तर, उद्या मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागेल, असे नागरिक बोलत आहेत.


0 Comments