भोकर :(रमेश गंगासागरे ) पर्यावरणाचे सतत बिघडणारे संतूलन अबाधित ठेवण्यासाठी सावली प्रतिष्ठानच्या वतीने आता गणेश ऊत्सवा निमित्ताने शहर व ग्रामीण भागातील जनतेसाठी वृक्षलागवड व संगोपण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाँ.विजयकुमार दंडे यांनी दिली आहे.
दिवसेनदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे, परिणामी त्याचा फटका निसर्गाला बसतो आहे. मानवी जीवनही धोकादायक बनले आहे. प्रचंड वृक्षतोड झाल्याने वनसंपदा नष्ट होत आहे. या भयंकर समस्येवर मात करण्यासाठी वृक्षलागवड व त्याचे संवर्धन करणे हाच एकमेव पर्याय ऊरला आहे. याची दखल घेवुन सावली प्रतिष्ठानने शहरात मोठ्याप्रमाणात झाडे लावली आहेत. केवळ लागवडीपूरते मर्यादित न राहता संगोपनाची जबाबदारी स्विकारली आहे. वृक्षलागवडी संदर्भात समाजात जनजागृती व्हावी म्हणून हि स्पर्धा आयोजीत केली आहे. सहभागी स्पर्धेत सेवाभावी संस्था. गणेश मंडळ. सामाजिक प्रतिष्ठान. महिला बचतगट. वैयक्तिक व्यक्ती सहभागी होऊ शकतात. शहरातील सार्वजनिक ठिकाणी, रस्त्याच्या दूतर्फा, किमान पंचवीस झाडे लावावीत. स्पर्धेचा कालावधी एका वर्षाचा असेल. पूढील वर्षी गणेशोत्सव काळा पर्यंत ती झाडे जगवतील त्या विजयी स्पर्धकास मान्यवरांच्या हस्ते पारीतोषीक दिले जाणार आहे.
पारितोषिकाचे स्वरूप
---------------------------------
प्रथम पारितोषिक(21.000)हजार रुपये.
(देवानंद धूत व्यंकटेश काँटन मील .पोमनाळा)
व्दितीय पारितोषिक(10.000)हजार रुपये.
तृतीय पारितोषिक(5000)हजार रुपये.व स्मृती चिन्ह. मानपत्र असे स्वरूप आहे.

0 Comments