भोकर :(रमेश गंगासागरे ) येथील न्यायालयाच्या वतीने आज दि,15 सप्टेंबर रोजी लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते, यात विविध कार्यालयातील प्रकरनासह घटस्फोटासाठी करण्यात आलेल्या तीन प्रकरणाचा समावेश होता त्यात तडजोडीअंती अनेक प्रकरणे निकाली निघाले असून न्यायालयाला तीन जोडप्याचें संसार जुळवण्यात मोठे यश आले आहे.
जिल्हा न्यायाधीश श्री, मुजीब शेख यांनी राबविलेल्या अनेक प्रयोगशील उपक्रमामुळे येथील न्यायालय नेहमीच चर्चेत राहिले असून राज्यात ह्या न्यायालयाने वेगळी छाप पाडली आहे. आज पारपडलेल्या लोकन्यायालयात हिमायतनगर तालुक्यातील आंदेगाव येथील गजानन तिरमलवाड व दिपाली तिरमलवाड यांच्या संसार वेलीवर 1मुलगी श्रुती वय वर्षे 2 फुलल्यावरही या दोघांच्या संसारात विघ्न आले त्यामुळे त्यांनी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला होता मागील चार महिन्यापासून ते विभक्त राहत असताना जिल्हा न्यायाधीश श्री मुजीब शेख यांचे वकील ॲडव्होकेट कुंटे सर यांनी त्या दोघात समेट घडवून पुन्हा त्यांचा संसार जुळवण्यात यश मिळविले आहे, तर दुसऱ्या प्रकरणात हाळदा ता.भोकर येथिल साहेबराव टिकेकर व राजाबाई टिकेकर यांनाही दोन वर्षांची 1 मुलगी असतांना मागील दीड वर्षांपासून ते विभक्त रहात होते, तसेच पवनातांडा येथील लक्ष्मण आडे व त्यांची पत्नी देवकाबाई हे मागील 8 वर्षांपासून विभक्त रहात होते, म्हणून हे प्रकरण न्यायालयात आल्यावर त्यांना ऍड.शिवाजी कदम, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील चिंचाळा आणि भुजंगराव पा.भोसले यांनी समजूत घालून दोघात समेट घडवून आणला शेवटी जिल्हा न्यायाधीश श्री, मुजीब शेख यांनी संसार जुळलेल्या तिन्ही जोडप्याना आशीर्वाद व मायेचा आहेर देऊन त्यांना सुखाने रहा, असा संदेश देत बिदाई केली, तेव्हा तिन्ही जोडप्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते. या वेळी न्यायमूर्ती पांडे, न्यायमूर्ती तळेकर, न्यायमूर्ती पठाण, आणि जेष्ठ वकील मंडळी ऍड.कुंटे, ऍड.शिवाजी कदम, ऍड.कुलकर्णी, ऍड.शृंगारे, ऍड.खंदारे इत्यादिनची उपस्थिती होती,
या सोबतच आजच्या लोकन्यायालयात एस.बि. आय.बँक, विज वितरण कंपनी, यासह ईतर प्रकरणातील 208 प्रकरणे नीकाली काढण्यात येवून त्यात 13 लाख 47 हजार 284 रुपयांची वसुली करून अवार्ड पास करण्यात आले. या साठी न्यायधीशांचे पॅनल तयार करण्यात आले होते, त्यात जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख,न्यायाधीश पांडे, न्यायाधीश पठाण, यांचा समावेश होता, लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी वरील सर्वानी परीश्रम घेतले.

0 Comments