संग्रहित छायाचित्र
भोकर :(रमेश गंगासागरे ) सरकार स्वच्छतेबाबत सगळीकडे गंभीर असताना तसेच शौचालयावर भोकर तालुक्यात कोट्यावधी रुपये खर्च होत असूनही लाभ घेतलेल्या नांदा म्हैसा पट्टी येथील अनेक शासकीय व निम शासकीय नागरिकांनी शौचालय न बांधताच आजही शौचालयला उघड्यावर जात असल्याने स्वच्छतेचे तोरे मिरवणाऱ्या सरकारचे वाभाडे निघाले आहेत.
संग्रहित छायाचित्र

       याबाबत कळालेली हकीकत अशी की, नांदा येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास मोहनाजी आरलवाड यांनी वरील बाबिचा लाभ घेणाऱ्या गावातील अनेक लाभार्थ्यांच्या नावानिशी लेखी निवेदनाद्वारे शासनाच्या निदर्शनास ही गंभीर बाब आणून देऊन तालुक्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे. रामदास आरलवाड यांनी जिल्हाधिकारी नांदेड, तहसीलदार भोकर, पोलीस अधीक्षक नांदेड, जिल्हा परिषद नांदेड, उपविभागीय अधिकारी भोकर व गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय भोकर यांना लेखी निवेदन देऊन कळविले आहे की, गावामध्ये ग्रामसेवकाच्या म्हणण्यानुसार 80% शौचालयाचे काम झालेले आहे, पण प्रत्यक्षात पाहणी केली असता एकही काम झालेले गावात दिसून येत नाही, त्यामुळे गावातील सरपंच, ग्रामपंचायतीचे काही सदस्य, माजी चेअरमन, डॉक्टर, आर्मीत असणारे नागरिक, आशा वर्कर, चौकीदार, माजी उपसरपंच, शिक्षक तसेच एक पोलीस कर्मचारी यांच्याकडे शौचालय उपलब्ध नाही, ही बाब नांदा येथील ग्रामसभेत दिनांक 21 ऑगस्ट 2019 रोजी गावकर्‍या समक्ष हा विषय मांडताना गावातील ग्रामसेवकाने तात्काळ ही ग्रामसभा बरखास्त केली. असे दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. तसेच ग्रामसेवकाने घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना बिले काढून देण्यासाठी प्रत्येकी पंधरा हजार रुपये घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे, त्यामुळे मागील चार वर्षापासून आमच्या गावचा विकास खुंटल्याचे निवेदनामध्ये रामदास यांनी नमूद केले आहे, रामदास यांनी दिलेल्या निवेदनामुळे सगळीकडे खळबळ माजली असून आता वरिष्ठ काय निर्णय घेतात याकडे संबंध तालुक्याचे लक्ष लागले आहे.