भोकर :- (रमेश गंगासागरे ) माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भोकर ग्रामीण रुग्णालयात आज सकाळी दिनांक 9 ऑगस्ट रोजी रुग्णांना विविध प्रकारची फळे वाटप करण्यात येऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.
       गोरठेकर साहेबांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या जिवलग कार्यकर्त्यांनी भोकर शहरात आज सगळीकडे वाढदिवसाचे विविध रंगीबेरंगी फलक लावून आपले प्रेम व्यक्त केले होते, त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात सकाळी सुभाष पाटील घंटलवार यांच्या वतीने उपस्थित रुग्णांना विविध प्रकारची फळे वाटप करण्यात आली, यावेळी मोहन पाटील हसापुरकर, माजी नगरसेवक जवाजभाई बरबडेकर, डॉ. फेरोज ईनामदार, संजय भाऊ मुरगुलवार, राजेश देशमुख, पप्पू गौड, संजय पाटील घंटलवार यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
       
     माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्यावर वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत असून भोकर, उमरी, धर्माबाद, मुदखेड, अर्धापूर, नांदेड, शिर्डी आदी भागात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांचा वाढदिवस साजरा करताना दिसून येत आहेत.