भोकर :(रमेश गंगासागरे ) नांदेड रेल्वे पोलिसात दाखल असलेल्या एका जबरी चोरीच्या गुन्ह्यासंदर्भात काही रेल्वेचे पोलीस कर्मचारी भोकर शहरात येऊन भोकर शहरातील दोन गल्ल्यांमध्ये जाऊन काही तरुणांना पकडून नेल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे .
दिनांक 26 ऑगस्ट रोजीच्या रात्री रेल्वे पोलीस भोकर शहरात येऊन, रेल्वेत दाखल असलेला गुन्हा क्रमांक, CR NO. 769 चा तपास करण्यासाठी भोकर शहरातील काही गल्ल्यांमध्ये फिरून चार ते पाच तरुणांना घेऊन गेल्याची चर्चा दबक्या आवाजामध्ये होत आहे, पण याबाबत कोणीच जास्तीची माहिती देण्यासाठी पुढे आला नसल्याने अधिक वृत्त मिळू शकले नाही, प्राप्त माहितीनुसार रेल्वेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री, हाश्मी हे आपल्या चार निवडक पोलिसांसह भोकर शहरात सदरील गुन्ह्याबाबत आल्याची नोंद आहे, पण सदरील गुन्ह्यात किती आरोपी हाती लागले ह्याची नोंद त्यांनी करू शकले नाहीत, त्यामुळे सविस्तर माहिती मिळू शकली नाही, भोकर शहरातील काही प्रतिष्ठित तरुण चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी, मौजमजा करण्यासाठी, आपले शौक पूर्ण करण्यासाठी, रेल्वेमध्ये चोऱ्या करत असल्याची शहरात चर्चा आहे, यामुळेच की काय, रेल्वे पोलीस भोकर शहरात येऊन कोणत्या गल्लीतील किती तरुण सोबत घेऊन गेली हे मात्र कळू शकले नाही.

0 Comments