सांगली/आटपाडी :-
(रमेश गंगासागरे)

       
       कोल्हापूर जिल्ह्यात पुराने सगळीकडे थैमान माजवले असून पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना नागरी सुविधा मिळणे कठीण होऊन बसले आहे, देशभरातील नागरिकांकडून पूरग्रस्तांना मदत येणे सुरू असतानाच सांगली जिल्ह्यातील आटपाडी भागातील मानदेशी लोकांनी पूरग्रस्तांना अल्पोपहाराची सोय करून माणुसकीचे दर्शन दिले आहे.
       आटपाडी येथून कोल्हापूरला स्वखर्चाने जाऊन तेथील 600 ते 700 लोकांना स्वखर्चाने अल्पोपहाराची सोय उपलब्ध करून दिली, यामध्ये सांगली मेंन भाग येथिल जिव्हाळा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री, उत्तम बालटे, सचिन नवले, दीपक अडसूळ, सोनू सागर, सलीम मुजावर, यांच्यासह असंख्य लोकांनी पूरग्रस्तांना माणुसकीच्या भावनेतून अल्पोपहार उपलब्ध करून दिल्याने आटपाडी मधून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.