नांदेड :- (रमेश गंगासागरे )  सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थामध्ये राष्ट्र भक्ती जागृत करण्याचा प्रयत्न अ.भा.वि.प करत असते.अ.भा.वि.प. दरवर्षी राखी पौर्णिमा प्रशासकिय कर्मचारी,स्वच्छता कामगार,रेल्वे कर्मचारी,पोलिस बांधव यांना राखी बांधुन रक्षा पौर्णिमा साजरी करते.
       
       योगायोगाने ह्यावर्षी एक सुवर्ण योग जुळुन आला आहे,  स्वातंञ्यदिन व राखी पौर्णिमा एकाच दिवशी आली आहे. भावा-बहिणीच्या या अतुट नात्याला एका धाग्यात बांधुण ठेवणारा हा सण आहे. ह्या सणाचा आनंद आपल्यासाठी सीमेवर जीवाची पर्वा न करता सदैव तत्पर असणाऱ्या सैनिक बांधवांना पण देवुन त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अ.भा.वि.प. नांदेड शाखेच्या वतीने एक राखी सैनिको के नाम ह्या उपक्रमाचे आयोजन करूण शहरातील प्रत्येक महाविद्यालयात जावुन विद्यार्थाना आव्हान केल व सैनिकांसाठी जास्तीजास्त राख्या मिळविल्या आहेत, ह्या उपक्रमातुन जमा केलेल्या राख्या मुदखेड येथे असलेल्या मिलटरी कॅम्पला पाठविल्या जाणार आहेत. ह्या उपक्रमास सर्वच स्थरातुन उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच ज्या इच्छुकांना ह्या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे अशांनी खालील पत्तत्यावर संपर्क साधण्याचे आव्हान केले आहे. 
पत्ता :- अ.भा.वि.प.कार्यालय फॅल्ट क्र. 307 लव्हेकर हॉस्पीटल शेजारी वजिराबाद नांदेड. अंतिम दि.14/08/2019 वेळ दु.3.00 पर्यत.