![]() |
| हेच ते श्रमदानातून तयार करण्यात आलेले शेततळे |
भोकर येथील पत्रकार, मेडिकल असोशियशन चे सदस्य, शिक्षकपरिषद, राजकिय सामाजिक क्षेत्रातिल समाजशील मंडळीनी एकत्र येवून तयार केलेल्या सेवा समर्पण परिवाराने भोकर तालुक्यातील , आमदरी, पांडुर्णा , रेणापूर, पोमणाळा, व कोळगाव बु येथे... अनघड बांध,आडवे चर ,व शेततळे खोदण्या च्या कामात गावक्ऱ्यांसोबत सहभाग नोंदवून गावकऱ्यांचा उत्साह वाढवला, कोळगाव (बु) येथे सतत 30 दिवस सकाळी ५ ते ९ या वेळेत श्रमदानातून १२×३० चे एक मोठे आकाराचे शेततळे तयार केले. या कामाची नोंद पानी फाऊंडेशनने घेतली असून यांच्या कार्याचा फोटो कार्यक्रमात दाखवला. कोळगाव (बु) ने पुरस्कार पटकावल्याने सेवासमर्पण परिवारातर्फे भोकरच्या दत्त गडावर काल दि, 11 ऑगस्ट रोजी कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.
भोकरच्या ऐतिहासिक दत्तगड व गणेश विसर्जणाच्या तलावाचे शुशोभिकरणाचे काम सध्या या परिवाराने हाती घेतले असुन वरील प्रोत्साहनाने कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला आहे, मागील सहा महिन्यांपासून सेवा समर्पण परिवार सामाजिक बांधिलकी जोपासत समाजाभिमुख काम करत आहे. या कामात सेवा समर्पण परिवार मधील शिक्षक नेते बालाजी तुमवाड, मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड, नारायण कुमरे, प्रा. डॉ. उत्तम जाधव, माधवराव पाटील वडगावकर, भगवान जोगदंड, गंगाधर तमलवाड, गजानन रेड्डी, प्रशांत जोशी, अशोक रेड्डी, अनिल जाधव, अंकुश हामद, रवी देशमुख, किशोर नरवाडे, किरण दशमुख, पत्रकार विठ्ठल फुलारी हे परिश्रम घेत आहेत.

0 Comments