![]() |
| पोलिस निरीक्षक विकास पाटील यांना निवेदन देताना कार्यकर्ते |
भोकर :- रमेश गंगासागरे
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल अपमानापस्पद वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मातंग समाजाच्या व अण्णा भाऊ साठे(महापुरुष) यांच्या अनुयायांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. ते पिंपरी चिंचवड येथे एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या भाष्यामुळे रामदास आठवले यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा. अशी तक्रार बहुजन रयत पार्टी प्रदेश कार्याध्यक्ष माधव मेकेवाड ,बालाजी चार्लेवाड(मराठवाडा उपाध्यक्ष),रवी गेंटेवार (नांदेड जिल्हा उपाध्यक्ष),स.जब्बार स. (तालुका अध्यक्ष),सय्यद महेमूद(ता.कार्याध्यक्ष),अमेरअली सज्जाद अली(तालुका युवक कार्याध्यक्ष, भोकर) व अन्य बहुजन रयत पार्टी कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते हे देखील भोकर पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होते .याबाबत अधिक माहिती अशी की ३ जुलै रोजी पिंपरी चिंचवड येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जनशताब्दी कार्यक्रमात आठवले यांनी अण्णाभाऊ यांनी लिहलेल्या गीतांचा अपमान करून म्हंटले की माझी मैना गावाकडं राहिली, म्हणून मुंबईकडे दुसरी पहिली. असे भाष्य आठवले यांनी केले. त्यामुळे अण्णा भाऊ साठेच्या अनुयायांची भावना दुखावल्या आहेत. तसेच आठवले यांच्या या अशा वक्तव्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते आणि समाजात अशांतता ही पसरवू शकते.त्यामुळे वेळीच त्यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.

0 Comments