भोकर : (रमेश गंगासागरे ) सरकारच्या चांगल्या योजना गोरगरीब तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे न्यायव्यवस्थाही सर्वांसाठी असून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणे हे न्यायसंस्थेचे कर्तव्य असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद येथील न्यायमूर्ती श्री किशोर सोनवणे यांनी भोकर येथे व्यक्त केले.
भोकर येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता तालुका विधी सेवा समिती, तहसील कार्यालय व पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय सेवा योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ मेळावा घेण्यात आला, प्रथम न्यायाधीश सोनवणे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करण्यात आले, तसेच भारतीय राज्यघटनेचे पूजनही या कार्यक्रमात करण्यात आले, संयोजन समितीतर्फे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षाचे रोपटे व सन्मानपत्र देऊन स्वागत करण्यात आले, आपल्या उद्घाटनपर भाषणात न्यायाधीश श्री, किशोर सोनवणे म्हणाले की, जिवंतपणी माणूस माणसाला मदत करीत नाही, मुलगा जन्मदात्या आईवडिलांची सेवा करत नाही, परंतु मृत्यू पावल्यावर शेकडो लोकांना जेऊ घातले जाते, मृतदेह हे स्मशानभूमीत नेल्यावर तिथे अंत्यसंस्काराच्या वेळी अनेकजण त्याचे कौतुक करतात मात्र जिवंतपणी माणूस माणसावर प्रेम करीत नाही, असे सांगत न्यायमूर्ती सोनवणे म्हणाले घरात उंदीर आणि साप दिसला की माणूस त्याला मारण्यासाठी धावतो, परंतु दुसरीकडे त्याच उंदराची आणि सापाची पूजा केली जाते, हे कितपत योग्य आहे, असा सवाल करून न्यायमूर्ती सोनवणे म्हणाले की, भोकर ची जनता किती भाग्यवान आहे येथील न्यायाधीश चांगले आहेत लोकांना चांगली सेवा देतात, विविध योजना राबवून माणुसकीचे दर्शन घडवतात, असे भोकर चे कर्तव्यदक्ष न्यायाधीश श्री मुजीब शेख यांचे व त्यांच्या टीमचे सोनवणे यांनी तोंड भरून कौतुक केले, पोलिसांनी सदरील कार्यक्रमात चोख बंदोबस्त ठेवून कोणाला त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याचा सल्लाही न्यायाधीशांनी पोलिसांना दिला होता, प्रथम प्रास्ताविक करताना न्यायाधीश श्री मुजीब शेख यांनी लोकांच्या जीवाशी निगडित विषय घेऊन हा मेळावा ठेवण्यात आल्याचे सांगून तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांना भेटवस्तू, शेतकऱ्यांना शासकीय योजनेच्या लाभा विषयी माहिती दिली,यावेळी तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनीही विचार मांडले, न्यायाधीशांच्या पत्नी सोनवणे, जिल्हा न्यायाधीश दीपक धोळकिया, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, न्यायाधीश तळेकर, न्यायाधीश त्रिभुवन, न्यायाधीश पठाण, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी श्री अशोक काकडे, जीएल रामोड गटविकास अधिकारी पंचायत समिती भोकर, यांच्यासह महसूलचे अधिकारी, न्यायाधीश, वकील मंडळी आणि तालुक्यातील असंख्य शेतकरी महिला व पुरुष यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती, सदरील मेळाव्यामध्ये भोकर पंचायत समिती m.s.e.b. , गॅस एजन्सी, महसूल विभाग, नगर परिषद, कृषी विभाग, फॉरेस्ट विभागातर्फे विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आलेले होते, या स्टॉलला दिवसभरातून हजारो नागरिकांनी भेटी देऊन माहिती घेतली व सरकारी योजना माहित करून घेतल्या आहेत, मेळाव्यात उपस्थित सर्व नागरिकांना अल्पोपहाराची सोय भोकर येथील सामाजिक संघटना भोकर विचार विकास मंच यांच्या वतीने करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट शिवाजी कदम यांनी केले. सदरील मेळाव्यास तालुक्यातून हजारो नागरिक महिला व पुरुष उपस्थित होते.

0 Comments